शिरूर तालुका

पिंपरी दुमाला गावाच्या उपसरपंचपदी शरद खळदकर यांची नियुक्ती

रांजणगाव गणपती (तेजस फडके) गावाच्या विकास कामांसाठी सुशिक्षित तरुणांनी राजकारणात लक्ष देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन सहकार मंञी दिलीप वळसे पाटील यांनी केले. पिंपरी दुमाला (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी शरद नानाभाऊ खळदकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांचा सत्कार करताना ते बोलत होते.

 

यावेळी मावळत्या उपसरपंच जयश्री संदीप सोनवणे यांनी पदाचा राजीनामा दिल्याने शरद खळदकर यांनी उपसरपंच पदासाठी अर्ज केला होता. या पदासाठी शरद खळदकर यांचा एकमेव अर्ज आल्याने ग्रामसेवक ढसाळ यांनी ही निवड बिनविरोध झाली असल्याचे घोषित केले. यावेळी सरपंच महेंद्र डोळस यांच्यासह गावातील विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

 

यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे, शिरुर-आंबेगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर पाटील, बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार, राजेंद्र गावडे यांसह पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येंने उपस्थित होते. दरम्यान सहकार मंञी दिलीप वळसे पाटील यांनी श्रावणी सोमवारचे औचित्य साधून पिंपरी दुमाला येथील सोमेश्वर महाराजांचे दर्शन घेऊन मंदिराच्या कामाची पाहणी केली.

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

22 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

22 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

22 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

22 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

22 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

22 तास ago