शिरूर तालुका

रामलिंग येथे नागपंचमी निमित्त वंचित घटकातील लहान मुलांना दुध व पुरण पोळीचे जेवण…

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष शिरुर शहर महिला आघाडी तसेच रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्था यांच्या वतीने आज (दि ९) रोजी नागपंचमीचे औचित्य साधुन वारुळाला दुध ओतण्याऐवजी समाजातील वंचित घटकातील मुलांना दुध देण्यात आले.

 

नागपंचमी हा सण ग्रामीण तसेच शहरी भागात मोठ्या उत्सवात साजरा केला जातो. महिलां फेर धरुन गाणी म्हणतात तसेच वारुळाला जाऊन त्याचे पुजन करुन नागपंचमी साजरी केली जाते. बऱ्याच ठिकाणी दूध आणि लाह्या त्या वारुळ मध्ये ओतल्या जातात. नाग दूध पितो असा महिलांचा समज आहे. परंतु वारुळामध्ये ओतलेले दुध वायाला जाते. त्या ऐवजी ते दुध गोरगरीब मुलांना प्यायला दिल्यास उपयोगी येते.

 

त्यामुळे नागपंचमीला आपण दुध वारुळामध्ये न ओतता त्यावेळी ते दुध वारुळाच्या मातीत मध्ये झिरपुन वायाला जाते. तेच दुध ज्या मुलांना दुध प्यायला मिळत नाही, गोड जेवण मिळत नाही, तिथे ते दिले पाहिजे. म्हणुन सर्व महिलांनी आपला दृष्टीकोन बदलुन गरजूंना मदत करावी. तरच खऱ्या अर्थाने नागपंचमी हा सण साजरा होईल असे मत रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले यांनी व्यक्त केले.

 

शिरुर येथील नेत्ररोग तज्ञ डॉ सोनल भालेकर यांच्या मुलीचा वाढदिवस आणि नागपंचमी एकाच दिवशी असल्याने त्यांनी मुलीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने समाजातील वंचित घटकातील मुलांना दुध व पुरण पोळीचे जेवण दिल्याने या लहान मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. यावेळी राणी कर्डिले, डॉ स्मिता कवाद, राणी शिंदे, रुपाली बोर्डे, ज्योती पारधी, शितल कापरे, ज्योती दळवी, माया दळवी व अनेक महिला उपस्थित होत्या.

शिरुर येथील बहुचर्चित बीओटी प्रकल्पातील ठेकेदाराकडुन महीलेची फसवणुक; मुख्यमंत्र्याकडे केली तक्रार

शिरुर; सासऱ्याचा सुनेबरोबर झाला वाद अन सुनेच्या दोन भावांनी व बहिणीने सासर्‍याला केले ठार

कारेगाव येथील यश इन चौकात हाकेच्या अंतरावर पोलिस स्टेशन असुनही खुले आम चालतोय वेश्या व्यवसाय…?

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

20 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

20 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

20 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

1 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago