crime

शिरुर; सासऱ्याचा सुनेबरोबर झाला वाद अन सुनेच्या दोन भावांनी व बहिणीने सासर्‍याला केले ठार…

क्राईम शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शहरात एका सुनेचे सासऱ्या बरोबर प्रांपंचिक वाद झाले होते या वादानंतर सुनेचे दोन भाऊ व एक बहीण सदर ठिकाणी आले त्यांनी सासर्‍याला केलेल्या जबर मारहाणीत सासऱ्याचा मृत्यू झाला आहे.

 

याबाबत सविस्तर माहिती अशी की (दि १) ऑगस्ट रोजी दुपारी २ च्या सुमारास शिरुर येथील होलमिल बेकरी जवळच्या डांबरी रोडवर वसंत दिलीप भोसले( वय ४३) रा. पाण्याच्या टाकीजवळ, शिरुर यांचे त्यांची सुन अंजली रुवल काळे हिच्या सोबत प्रापंचिक वाद झाले होते. या वादाच्या कारणावरुन सुनेचे दोन भाऊ १) नागरेष बाजीराव काळे २) राजेश बाजीराव काळे व एक बहीण ३) निघु बाजीराव काळे सर्व रा. पाण्याच्या टाकीजवळ, शिरुर यांनी कोयत्याच्या उलट्या बोथट बाजूने वसंत भोसले यांच्या छातीत, पायावर मारुन डांबरी रोडने फरपटत नेऊन जबर मारहाण केली होती.

 

त्या जबर मारहाणीत वसंत भोसले हे (दि ५) ऑगस्ट रोजी मरण पावले. या खून प्रकरणी नागरेश बाजीराव काळे, राजेश बाजीराव काळे ,निघु बाजीराव काळे यांच्या विरोधात शिरुर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या प्रकरणाचा आधिक तपास पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरुर पोलीस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक सुनील उगले हे करत आहेत.

पिंपळे जगताप कडे जाणारा रस्ता दुरुस्त करा अन्यथा उपोषण करु; ग्रामस्थांचा प्रशासनाला इशारा

शिरुर; ट्रक मालक-चालकाने केला आठ लाख रुपयाच्या कांदयाचा अपहार; गुन्हा दाखल

कारेगाव येथील यश इन चौकात हाकेच्या अंतरावर पोलिस स्टेशन असुनही खुले आम चालतोय वेश्या व्यवसाय…?