शिरूर तालुका

शिरुर येथील बहुचर्चित बीओटी प्रकल्पातील ठेकेदाराकडुन महीलेची फसवणुक; मुख्यमंत्र्याकडे केली तक्रार

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर पंचायत समिती शिरुर येथील बहुचर्चित बी.ओ.टी प्रकल्पातील व्यापारी गाळयासाठी शिरुर येथील सिमा गिरमकर (रा. शिरुर) या महिलेने बुकींग करुन सन २०१५ पासून २०२२ पर्यंत ठेकेदाराला वेळोवेळी पैसे देऊनही ठेकेदाराने त्यांना गाळा देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे त्यांचा मानसिक व आर्थिक छळ झाला असुन त्यांना याबाबत न्याय मिळत नसल्याने त्या कुंटुबासह त्याच इमारतीवरुन स्वातंत्र्यदिनी (दि. १५) ऑगस्ट रोजी उडी मारुन जीवनयात्रा संपवणार आहेत. याबाबत लेखी पत्र त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस ,अजितदादा पवार, खासदार अमोल कोल्हे ,आमदार अशोक पवार, शिरुरचे तहसीलदार तसेच पोलीस स्टेशन यांना दिले आहे.

 

सिमा गिरमकर यांनी मोठ्या कष्टाने पै-पै गोळा करुन व्यवसायासाठी गाळा घेण्याचे ठरवले होते. ठेकेदाराला वेळोवेळी पैसे देऊनही ठेकेदाराने अद्याप त्यांना त्या गाळ्याचे खरेदीखत करुन दिलेले नाही. ठेकेदाराला भरलेले पैसे बँक नियमाप्रमाणे दुप्पट पैसे झाले असते. त्यांनी वेळोवेळी गटविकास अधिकाऱ्यांकडे याबाबतची तक्रार केली होती .

 

त्यामुळे पंचायत समिती बीओटी ठेकेदार, गटविकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांच्यापासून होणाऱ्या त्यांच्या आर्थिक व मानसिक छळा पासून त्यांना न्याय मिळेल का…? त्यांच्या कुटुंबाच्या कष्टाच्या भरलेल्या पैशातुन त्यांना जगण्यासाठी घेतलेला गाळा त्यांना आता मिळेल का.. ? अशा एका असह्य महिलेने तिला हक्काचा न्याय मिळवुन देण्यासाठी त्यांनी पत्रव्यवहार केला असुन त्यांना न्याय न मिळाल्यास त्या आता १५ ऑगस्ट रोजी सहकुटुंब त्याच बीओटी इमारतीवरुन उडी मारणार आहे. किंवा सतरा कमानी पुलावरुन उडी मारुन जलसमाधी घेणार आहेत. याबाबत पोलिस प्रशासन, पंचायत समिती काय भुमिका घेणार…? याकडे शिरुर तालुक्याचे लक्ष लागले आहे.

शिरुर; सासऱ्याचा सुनेबरोबर झाला वाद अन सुनेच्या दोन भावांनी व बहिणीने सासर्‍याला केले ठार

कारेगाव येथील यश इन चौकात हाकेच्या अंतरावर पोलिस स्टेशन असुनही खुले आम चालतोय वेश्या व्यवसाय…?

शिरुर; ट्रक मालक-चालकाने केला आठ लाख रुपयाच्या कांदयाचा अपहार; गुन्हा दाखल

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

8 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

11 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

13 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

2 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

3 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

3 दिवस ago