शिरूर (अरुणकुमार मोटे): सविंदणे (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच श्री गुरुदेव दत्त विद्यालय येथे जाणीव शैक्षणिक १ संकल्पना ट्रस्ट यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांसाठी वह्या व खाऊ वाटपाचा उपक्रम उत्साहात पार पडला.
या उपक्रमाचे प्रमुख प्रणेते ट्रस्टचे संस्थापक व अध्यक्ष रवींद्र ढगे,आपटी असून, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब ढगे आणि सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण गव्हाणे यांच्या संकल्पनेतून गरजू व हुशार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करून त्यांचा आत्मविश्वास वाढविणे हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
यावेळी शिरूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर, विस्तार अधिकारी किसन खोडदे, केंद्रप्रमुख सुनील जोशी, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाळासाहेब भोर, अर्जून लंघे. बाळासाहेब पडवळ, डी आर लंघे, मुख्याध्यापक सोहम पहिलवान, बोखारे सर, पवार सर,चिकटे सर,पवार सर शिक्षकवृंद व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या व खाऊ वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ट्रस्टच्या कार्यकर्त्यांसह शाळेतील शिक्षकवृंद व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक उभारी मिळून शिक्षणाची आवड वाढण्यास हातभार लागणार असल्याचे उपस्थित मान्यवरांनी नमूद केले.
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…