मुख्य बातम्या

पोलीस निरीक्षक संदेश केंजळे व उपनिरीक्षक नकाते यांना नक्षलग्रस्त भागातील सेवेसाठी विशेष सेवा पदक

शिरूर (अरुणकुमार मोटे): शौर्य, निष्ठा आणि सेवाभाव यांचा उत्कृष्ट संगम घडवून आणत शिरूर पोलिस दलातील दोन अधिकाऱ्यांनी संपूर्ण शिरूर तालुक्याचा अभिमान वाढवला आहे. शिरूर पोलीस निरीक्षक संदेश केंजळे आणि पोलीस उपनिरीक्षक हनमंत नकाते यांना नक्षलग्रस्त भागात केलेल्या उल्लेखनीय, धाडसी व प्रामाणिक सेवेबद्दल विशेष सेवा पदक जाहीर झाले आहे.

पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी 2021 ते 2024 या कालावधीत गोंदिया या नक्षलग्रस्त भागात कार्य करताना, गुन्हेगारी आटोक्यात आणणे, जनजागृती करणे व स्थानिक युवकांना पोलिस भरतीसाठी प्रेरित करण्याची महत्वपूर्ण कामगिरी केली. यापूर्वी 2010 ते 2013 दरम्यान गडचिरोली जिल्ह्यातील केशोरी पोलीस स्टेशनमध्ये अशाच धाडसी सेवेसाठी त्यांना प्रथमच विशेष सेवा पदक मिळाले होते. त्यामुळे केंजळे हे दुसऱ्यांदा या मानाच्या पदकाने सन्मानित होत आहेत.

सन 2024 मध्ये शिरूरचे पोलीस निरीक्षक म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी विविध गुन्ह्यांची उकल करून नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे. “ज्या जबाबदाऱ्या मिळतात, त्या प्रामाणिकपणे व निष्ठेने पार पाडणे हीच माझी खरी ताकद,” असे त्यांनी पदकाबद्दलच्या भावना व्यक्त केल्या.

शिरूर पोलीस स्टेशनमधील पोलिस उपनिरीक्षक हनमंत नकाते यांनी नक्षलग्रस्त भागात कार्यरत असताना कठीण परिस्थितीतही चिकाटी, धैर्य आणि सेवाभावाने काम केले. स्थानिकांमध्ये विश्वास निर्माण करून कायदा व सुव्यवस्था राखण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली, ज्याची दखल घेऊन त्यांनाही विशेष सेवा पदकाचा बहुमान मिळाला आहे.

पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी विशेष सेवा पदकप्राप्त अधिकाऱ्यांची यादी जाहीर केली असून त्यात शिरूरमधील केंजळे आणि नकाते यांची नावे झळकली. एकाच वेळी एका पोलीस स्टेशनमधील दोन अधिकाऱ्यांना असा सन्मान मिळणे ही दुर्मीळ घटना ठरली आहे. या दोघांच्या कार्यगौरवामुळे संपूर्ण शिरूरमध्ये आनंद आणि अभिमानाचा माहोल असून, विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

औषधनिर्मिती क्षेत्रातील संशोधनाला महाराष्ट्राचे बळ! जागतिक कंपन्यांना सर्वतोपरी सहकार्य करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ॲस्ट्राझेनेकाच्या मुंबईतील जागतिक दर्जाच्या मुख्यालयाचे उद्घाटन; दर्जेदार आणि किफायतशीर आरोग्यसेवेवर भर मुंबई: औषधनिर्मिती क्षेत्रात संशोधन आणि…

2 तास ago

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

24 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

2 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

2 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

2 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

2 दिवस ago