रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): अष्टविनायका मधील हे आठवे स्थान असलेल्या रांजणगाव येथील महागणपतीचा लौकिक सर्व महाराष्ट्रात नवसाला पावणारा गणपती म्हणुन आहे गुरुवार (दि १३) रोजी संकष्ट चतुर्थी निमित्त पहाटे 5 वाजता अभिषेक, तसेच दुपारी 12 वाजता महापूजा व महानैवेद्य देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आला. संकष्ट चतुर्थी निमित्त प्रगतशील शेतकरी नानासाहेब दिनकरराव पाचुंदकर पाटील यांच्या वतीने मंदिराच्या गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली.
संकष्टी चतुर्थी निमित्त पहाटे ५ वाजता अभिषेक करून मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. तसेच भाविकांसाठी उत्तम प्रकारे जलद दर्शन व्यवस्था, खिचडी प्रसाद, पिण्याचे पाणी तसेच श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्ट व अष्टविनायक ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. इत्यादी सुविधा देवस्थान ट्रस्ट तर्फे देण्यात आल्या.
यावेळी देवस्थान चे विश्वस्त मंडळ डॉ. संतोष दुंडे, प्रा. नारायण पाचुंदकर, अँड. विजयराज दरेकर, व्यवस्थापक बाळासाहेब गोऱ्हे, हिशोबणीस संतोष रणपिसे, पुजारी प्रसाद कुलकर्णी, मकरंद कुलकर्णी व देवस्थान कर्मचारी, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…
नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…