शिरूर तालुका

दिलीप थोरात यांची चेअरमन तर विश्वनाथ कारकूड यांची व्हाईस चेअरमनपदी निवड!

वाघाळेः वाघाळे विविध विकास कार्यकारी सेवा सोसायटी चेअरमन पदी दिलीप मच्छिंद्र थोरात तर व्हाईस चेअरमनपदी विश्वनाथ कारकूड यांची बिनविरोध निवड झाली आहे.

वाघाळे येथे आज (गुरुवार) सोसायटी चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठी निवडणूक घेण्यात आली. चेअरमन बबनराव भोसले व व्हाईस चेअरमन बाळू थोरात यांनी इतरांना संधी मिळावी या हेतूने आपापल्या पदांचे राजीनामे दिले होते. आज अध्यक्ष पदासाठी दिलीप थोरात तर उपाध्यक्ष पदासाठी विश्वनाथ कारकूड यांचेच एकमेव अर्ज आले होते. त्यामुळे या दोघांनाही बिनविरोध म्हणून घोषित करण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक पुंड यांनी काम पाहिले.

नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा सोसायटीच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी माजी सरपंच तुकाराम भोसले, उपसरपंच दादासाहेब सोनवणे, सुरेश थोरात, लहू थोरात, बबन शेळके, पांडूरंग घोलप, दत्तात्रय गायकवाड, दादाभाऊ कारकूड, किसन गोरडे, देवराम थोरात, आनंदराव थोरात, अशोक सोनवणे, एकनाथ डफळ आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुर्यकांत बढे (गुरुजी) यांनी केले तर आभार विश्वास शेळके यांनी मानले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

3 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

3 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

3 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

3 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

3 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

3 तास ago