शिरूर तालुका

अंगारक संकष्ट चतुर्थी निमित्त श्री महागणपतीला फुलांची आकर्षक सजावट

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे ) शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती हे अष्टविनायका मधील आठवे स्थान असुन या महागणपतीचा लौकिक सर्व महाराष्ट्रात नवसाला पावणारा गणपती म्हणुन आहे. आज मंगळवार (दि 13) रोजी अंगारक संकष्ट चतुर्थी निमित्त पहाटे 5 वाजता अभिषेक करुन मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले.. तसेच दुपारी 12 वाजता देवस्थान ट्रस्टच्या वतीने महापूजा व महानैवेद्य करण्यात आला. अंगारक संकष्ट चतुर्थी निमित्त गावचे प्रगतशील शेतकरी नानासाहेब दिनकरराव पाचुंदकर पाटील यांच्या वतीने मंदिर गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.

तसेच अंगारक संकष्ट चतुर्थी निमित्त भाविकांसाठी उत्तम प्रकारे जलद दर्शन व्यवस्था, खिचडी प्रसाद, पिण्याचे पाणी आदी सुविधा देवस्थान ट्रस्ट तर्फे देण्यात आल्या. तसेच श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्ट व अष्टविनायक ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी देवस्थानचे विश्वस्त डॉ. संतोष दुंडे, प्रा. नारायण पाचुंदकर, अँड. विजयराज दरेकर, व्यवस्थापक बाळासाहेब गोऱ्हे, पुजारी प्रसाद कुलकर्णी , मकरंद कुलकर्णी व देवस्थान कर्मचारी, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago