क्राईम

अंगात दैवी शक्ती असल्याचे सांगत तरुणीवर सलग 3 वर्ष बलात्कार…

मुंबई: एका 58 वर्षीय व्यक्तीने आपल्या अंगात दैवी शक्ती असल्याचे भासवून सलग 3 वर्षे तरुणीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना वर्सोवा परिसरातून समोर आली आहे. आरोपीने पीडितेवर 2019 पासून अनेकदा बलात्कार केल्याचा आरोप आहे.

सुरुवातीला प्रसादामध्ये गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्यानंतर या व्यक्तीने नंतर तिला धमकावून, भीती दाखवून हा प्रकार सुरु ठेवला. अखेर सततच्या अत्याचारांना कंटाळून पीडित मुलीने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सुरेशकुमार हा एका प्रसिद्ध आयटी कंपनीमध्ये नोकरीला आहे. तो अंधेरीच्या म्हाडा कॉलनी परिसरात राहत आहे. काही लोकांनी ओळख करुन दिल्यानंतर पीडितेचे कुटुंब सुरेशकुमार रवींद्र नारायण अवस्थी नावाच्या स्वयंभू धर्मगुरुच्या संपर्कात आले. त्याने आपल्या अंगात दैवी शक्ती असल्याचे भासवून या कुटुंबातील मुलीला ऑक्टोबर २०१९ मध्ये आपल्या घरी बोलावून प्रसाद खायला दिला.

आरोपीने प्रसादामधून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला आणि त्याचे मोबाइलने चित्रीकरण केले. त्यावेळी ही मुलगी अल्पवयीन होती. तिचे आक्षेपार्ह फोटो इंटरनेटवर अपलोड करण्याची धमकी दिली. मोबाइलमधील चित्रीकरणाच्या आधारे मुलीला ब्लॅकमेल करुन अंधेरी आणि कुर्ला येथील निवासस्थानी नेऊन तो तिच्यावर लैंगिक अत्याचार करु लागला.

अखेर सततच्या अत्याचारांना कंटाळून मुलीने हा प्रकार घरी सांगितला. त्यानंतर त्यांनी सुरेशकुमार याच्या विरुद्ध वर्सोवा पोलिस ठाण्यात तक्रार केली. त्यांच्या तक्रारीवरुन वर्सोवा पोलिसांनी सुरेशकुमार याच्या विरोधात बलात्कार, धमकी तसेच पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. रविवारी भारतीय दंड संहिता आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्याच्या तरतुदींनुसार आरोपीला अटक करण्यात आली. अधिक चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

16 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

16 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

16 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

16 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

16 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

16 तास ago