शिरूर तालुका

पाबळ महाविद्यालयात रक्तदान शिबिर संपन्न

शिक्रापूर (शेरखान शेख): पाबळ (ता. शिरुर) येथील श्री पद्ममणि जैन महाविद्यालयात एनसीसी स्थापना दिनाच्या निमित्त एन. सी. सी. विभाग व चाकण ब्लड सेंटर यांच्या वतीने नुकतेच भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असता अनेक विद्यार्थ्यांनी रक्तदानात सहभाग घेतला होता.

पाबळ (ता. शिरुर) येथील श्री पद्ममणि जैन महाविद्यालयात आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन प्राचार्य डॉ. संजय घोडेकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी चाकण ब्लड बँकेच्या डॉ. स्मिता शिंदे, आकाश जगताप, आशिष तळेकर, डॉ. गणेश सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना रक्तदानाचे महत्व पटवून देत रक्तदान प्रक्रीयेची माहिती विद्यार्थ्यांना दिली. सदर शिबिरामध्ये महाविद्यालयातील एन. सी. सी. विभागासह महाविद्यालयाचे विद्यार्थी, पाबळ गावातील काही युवक व माजी विद्यार्थी सहभागी झाले होते.

दरम्यान 50 हून अधिक विद्यार्थ्यांनी रक्तदान केले. तसेच यावेळी महाविद्यायातील तब्बल 120 विद्यार्थीनींचे हिमोग्लोबीन तपासणी करण्यात आले असून हिमोग्लोबीन कमी असलेल्या विद्यार्थिनींना डॉक्टरांकडून मार्गदर्शन करण्यात आले. दरम्यान प्राचार्य डॉ. संजय घोडेकर यांनी सर्वांचे आभार मानले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मालवणीत दहीहंडी उत्सवाला गालबोट; ७ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई:💞 मालवणी परिसरात दहीहंडी उत्सवादरम्यान घडलेल्या दुर्दैवी घटनेत ७ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. हंडी फोडताना विटांचा…

18 मिनिटे ago

डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…

15 तास ago

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…

15 तास ago

सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…

15 तास ago

‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…

15 तास ago

कायद्याची लाठी सर्वांसाठी समान आहे का? संतोष पंडित यांच्या अटकेने महाराष्ट्रासमोर मोठा सवाल!

लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…

15 तास ago