आरोग्य

हे पदार्थ दुधात मिसळल्यास त्याचा फायदा दुप्पट होतो

आपल्याला अनेक औषधी वनस्पती माहिती आहेत, मात्र जर त्या दुधात मिसळल्या तर त्याचे फायदे दुप्पट होतात याची अनेकांना कल्पना नसते. आयुर्वेदात म्हणल्याप्रमाणे, औषधी वनस्पती कमकुवत रोगप्रतिकारशक्ती, शरीराच्या विविध वेदना आणि स्नायूंचा थकवा यांसारख्या अनेक समस्यांवर रामबाण उपाय ठरु शकतात.

हळद आणि दूध

हळद ही एक अशी औषधी वनस्पती आहे जी दुधात मिसळल्यास शरीरातील दुखणी तसंच जखमा दूर होतात. हळदीमध्ये कर्क्यूमिन असते जे अँटिऑक्सिडेंट म्हणून काम करतं. हे कर्क्यूमिन अँटीइफ्लामेटरी गुणधर्मांनी समृद्ध आहे. ज्यामुळे वेदना कमी करण्यास, स्नायूंना आराम करण्यास आणि रोगांपासून बरे होण्यास मदत करते.

दूध आणि अश्वगंधा

अश्वगंधा ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे जी शरीरासाठी फायदेशीर असतं. यामुळे ताण-तणाव कमी होतो आणि रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते. अश्वगंधाचा खास गुण म्हणजे शरीराला आराम मिळण्यास मदत होते. यामुळे झोप, स्मरणशक्ती, स्नायूंचं आरोग्य स्टॅमिना वाढण्यास मदत होते.

दूध आणि केशर

स्टॅमिना वाढवायचा असेल दुधामध्ये केशर मिसळा. केशरमध्ये अनेक अँटीऑक्सिडंट असतात जे हार्मोनल आरोग्य सुधारण्यास आणि शरीर निरोगी ठेवण्यास फायदेशीर असतात. सतत मूड स्विंग होणाऱ्या व्यक्तींनाही याचा फायदा होतो.

(सोशल मीडियावरुन साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

2 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

3 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago