शिरूर तालुका

शिक्रापुरात अपघातानंतर दुचाकी घेऊन कार चालक फरार

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे कार व दुचाकी चा किरकोळ अपघात झाल्यानंतर कार चालक अपघातातील दुचाकी घेऊन फरार झाल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात कार चालकावर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील तळेगाव रोड परिसरातून माधव भोसले हा एकोणीस मार्च रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास त्याच्या ताब्यातील एम एच ४२ एल ९९७३ या दुचाकीहून जात असताना एस टी स्थानक समोर एका स्विफ्ट कारचा दुचाकीला धक्का लागून किरकोळ अपघात होत कारचा आरसा फुटला.

दरम्यान दुचाकी चालक रस्त्यावर पडल्याने घाबरला त्यामुळे तो पळत आपल्या मित्रांकडे गेला. मात्र यावेळी कार चालक युवक व महिलेने काही युवकांना बोलावून घेत सदर ठिकाणी असलेली दुचाकी घेऊन पोबारा केला. त्यानंतर माधव भोसले सह त्याच्या सहकाऱ्यांनी अनेक ठिकाणी दुचाकीचा शोध घेतला. मात्र दुचाकी मिळून आली नाही.

याबाबत अमर हनुमानराव शिंदे (वय २४) रा. शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात कार चालकावर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बनकर व अमोल रासकर हे करत आहे.

शिक्रापूर येथील अपघातानंतर स्विफ्ट कार चालकाने नेलेल्या दुचाकी अथवा कार चालकाबाबत कोणालाही काही माहिती असल्यास शिक्रापूर पोलिसांशी ०२१३७२८६३३३ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन शिक्रापूर पोलिसांनी केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

11 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 दिवस ago