शिरूर तालुका

शिरूर तालुक्यातील काळूबाईनगर शाळेत वार्षिक स्नेहसंमेलनाचा जल्लोष

शिरूर (अरुणकुमार मोटे): काळूबाईनगर ही शिरूर तालुक्यातील कवठे केंद्रातील ३४ पट असलेली छोटी शाळा आणि छोट्या शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात अडथळा येतो. हा गैरसमज दूर करण्याची कामगिरी या शाळेने करून दाखवली.

पालकांना आणि प्रेक्षकांना तब्बल साडेतीन तास एका जागेवर खिळवून ठेवण्याची किमया या शाळेतील विद्यार्थ्यांनी करून दाखवली. शिवराज्याभिषेक सोहळा,प्रतीकात्मक विवाह सोहळा, बळीराजाची व्यथा, महाराष्ट्राची लोकधारा असणारी लावणी, लोकगीते, विठुरायाचा गजर असे एकापेक्षा एक सरस सादरीकरणाने प्रेक्षकांचे मनोरंजन करताना हसवता हसवता कधी टचकन डोळ्यातून पाणी येणारे भावविवश प्रसंग उभे राहायचे,हे पाहणार्याच्याही लक्षात येत नव्हते. प्रत्येक गीतानंतर होणारा टाळ्यांचा कडकडाट आणि बक्षिसांची खैरात बरंच काही सांगून गेली. बैलगाडा शर्यत म्हणजे पुणे जिल्ह्याची शान,प्रत्यक्ष बैलगाडा स्पर्धेच्या घाटाचे वातावरण शेवटी तयार झाले होते.

कार्यक्रमाचे उदघाटन सावित्राशेठ थोरात यांच्या शुभहस्ते झाले. कार्यक्रमासाठी बाळासाहेब डांगे, वसंतशेठ पडवळ, मनीषाताई नरवडे, रवींद्र पडवळ, मालुबाई मिंडे, अविनाश पोकळे, बापूसाहेब लांडगे, शरद निंबाळकर, अविनाश चव्हाण, सतीश पाचर्णे, विठ्ठल मुंजाळ, मारुतीशेठ इचके, कैलास गारगोटे, प्रभाकर शेळके, श्रीकांत निचित, भास्कर थोरात, पी सी बारहाते ,शरद धोत्रे,लहू शितोळे, कैलास सोदक, बाबासाहेब शेरकर, पाटीलबुवा डफळ, संतोष जाधव, एकनाथ शिंदे, अयुब तांबोळी, सुनील खोमणे, बाळासाहेब इचके, मच्छिन्द्रनाथ कुंभार, संतोष निचित, बाबाजी निचित, शैला इचके, प्रमिला इचके, राजश्री अरुणकुमार मोटे, ज्योती निचित यांनी उपस्थित राहून बालकलाकारांच्या कलेला दाद दिली.

कार्यक्रमाचे नियोजन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संभाजी इचके, उपाध्यक्षा शामल इचके,रामभाऊ इचके, मनोहर नरवडे, सुधीर पडवळ, विद्या इचके, नितीन इचके, गणेशशेठ इचके, दिलीप इचके, मुख्याध्यापक बाबाजी मेचे यांनी केले. सूत्रसंचालन कैलास पडवळ व निलेश पडवळ यांनी केले, आभार प्रकाश इचके सर यांनी मानले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

वय वाढल्यामुळे तुमच्या पोटावर आणि त्याच्या कार्यांवर होतो असा परिणाम

आपल्या वयानुसार शरीरात विविध शारीरिक बदल होतात आणि पचनसंस्थेचाही त्यात समावेश आहे. हे बदल पचनक्रियेवर…

45 मिनिटे ago

हृदयासाठीही फायदेशीर आहे आवळ्याचं ज्यूस!

आयुर्वेदात आवळा हे काही उत्तम फळांपैकी एक फळ मानले जाते. आवळ्याचे जूस पिल्याने आरोग्याशी संबंधित…

53 मिनिटे ago

बळीराजाची दिवाळी काळी होऊ देणार नाही; एकनाथ शिंदेंचा निर्धार

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नवरात्र मंडळांनी पुढाकार घ्यावा; टेंभी नाक्याच्या देवीसमोर शेतकऱ्यांसाठी साकडे ठाणे: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त…

56 मिनिटे ago

ओबीसींच्या स्वतंत्र जनगणना कॉलमसाठी वडेट्टीवारांचा एल्गार! २ नोव्हेंबरला भारत बंद, १५ नोव्हेंबरला दिल्लीत शक्तिप्रदर्शन

नागपूर घोषणापत्र जाहीर; १८ राज्यांतील ओबीसी संघटनांची एकजूट, ‘नॅशनल ओबीसी न्याय मोर्चा’ची स्थापना नागपूर: जनगणनेत…

1 तास ago

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बजावला मतदानाचा हक्क; सोमेश्वर कारखान्याच्या सभासदांना मतदानाचे आवाहन

बारामती: श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा…

1 तास ago

शिरूर तालुक्यात शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक मोटारी चोरीला; गुन्हा दाखल…

न्हावरे (तेजस फडके): इनामगाव (ता.शिरुर) येथे शेतजमिनीतून दोन विद्युत मोटारी चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली…

6 तास ago