आरोग्य

दररोज च्यवनप्राश खाण्याचे फायदे आणि तोटे तुम्हाला माहिती आहेत का

च्यवनप्राश एक प्राचीन आयुर्वेदिक औषध आहे. ज्याचे शतकानुशतके भारतीय घरांमध्ये सेवन केले जात आहे. हा गडद, ​​चिकट पदार्थ प्रामुख्याने आवळा आणि औषधी वनस्पती व मसाल्यांच्या मिश्रणापासून बनवला जातो. च्यवनप्राशच्या आरोग्य फायद्यांमुळे हल्ली लोक पुन्हा मोठ्या प्रमाणात त्याचे सेवन करू लागले आहेत. पण, जेव्हा तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत च्यवनप्राशचा समावेश करता तेव्हा तुमच्या शरीरावर त्याचा काय परिणाम होतो.

पारंपरिक औषधी असलेल्या आयुर्वेदिक च्यवनप्राशचे दररोज सेवन केल्याने व्यक्तीच्या एकूण पोषण आहारावर सकारात्मक परिणाम होतो. च्यवनप्राशमधील आवळा हा क जीवनसत्त्वाचा समृद्ध स्रोत आहे. आवळा रोगप्रतिकार शक्ती मजबूत करतो आणि महत्त्वपूर्ण अँटिऑक्सिडंट्सचे फायदे प्रदान करतो. तसेच च्यवनप्राशमधील आले, दालचिनी, वेलची यांसह औषधी वनस्पती व मसाल्यांचे मिश्रण पचनास मदत करते आणि चयापचय कार्ये वाढवते. त्याव्यतिरिक्त च्यवनप्राशमध्ये अ व ई ही जीवनसत्त्वे, कॅल्शियम व लोह यांसारखे आवश्यक पोषक घटक असतात, जे एकूण पोषण संतुलनात योगदान देतात.

अश्वगंधा व शतावरी यांसारख्या ॲप्टोजेनिक औषधी वनस्पती ताण कमी करण्यास मदत करतात आणि उर्जा वाढवतात. फॉर्म्युलेशनमधील मध व तुपाची उपस्थिती पोषक घटक शोषणास मदत करते आणि निरोगी चरबीचा स्रोत प्रदान करते. परंतु, यातील साखरेमुळे “अत्याधिक कॅलरीचे सेवन टाळण्याकरिता संयम ठेवणे गरजेचे आहे.” “च्यवनप्राश संतुलित आहारासाठी, रोगप्रतिकार शक्ती, पचनशक्ती आणि सर्वसाधारणपणे शरीराचे सामान्यत: कल्याण साधण्यासाठी एक मौल्यवान जोड असू शकते.”

च्यवनप्राश खाण्याचे फायदे

सुषमा यांच्या म्हणण्यानुसार, च्यवनप्राश नियमित सेवनाने रोगप्रतिकारक शक्तीला अनेक विशिष्ट फायदे प्रदान करते.

व्हिटॅमिन सी समृद्ध करते

च्यवनप्राशमधील प्राथमिक घटक आवळा आहे, ज्यामध्ये क जीवनसत्त्वाचे प्रमाण अपवादात्मकपणे जास्त आहे. हे जीवनसत्त्व रोगप्रतिकार शक्तीच्या योग्य कार्यासाठी महत्त्वपूर्ण आहे, ज्यामुळे संक्रमणांपासून बचाव करण्याची शरीराची क्षमता वाढविण्यास मदत होते.

अँटिऑक्सिडंट्स गुणधर्म

च्यवनप्राशमध्ये अश्वगंधा, तुळशी व पिंपळी यांसारख्या विविध प्रकारच्या अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध औषधी वनस्पती आणि मसाले असतात. अँटिऑक्सिडंट्स मुक्त रॅडिकल्सला तटस्थ करण्यात मदत करतात, ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करतात आणि रोगप्रतिकारक पेशींचे संरक्षण करतात.

पांढऱ्या रक्तपेशींच्या कार्यक्षमतेत वाढ

गिलॉय आणि शतावरी सारखे घटक पांढऱ्या रक्तपेशींची क्रियाशीलता आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी ओळखले जातात, जे रोगप्रतिकारकतेच्या प्रतिसादासाठी आवश्यक आहेत.

निरोगी रोगप्रतिकार शक्ती

हळद, आले व च्यवनप्राशमधील इतर घटकांचे दाहकविरोधी गुणधर्म शरीरातील जळजळ कमी करण्यास मदत करतात आणि निरोगी रोगप्रतिकारक प्रतिसादास समर्थन देतात.

प्रतिजैविक गुणधर्म

मध आणि कडुलिंब यांसारख्या घटकांमध्ये नैसर्गिक प्रतिजैविक गुणधर्म असतात, ज्यामुळे शरीराला जीवाणू, विषाणू व बुरशीजन्य संसर्गाचा सामना करण्यास मदत मिळते.

आतड्यांचे आरोग्य सुधारते 

मजबूत रोगप्रतिकार शक्तीसाठी निरोगी पचनसंस्था महत्त्वाची आहे. आले आणि दालचिनीसारखे घटक पचनास मदत करतात आणि संतुलित आतड्यांतील मायक्रोबायोम राखण्यास मदत करतात, जे रोगप्रतिकार शक्तीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

वय वाढल्यामुळे तुमच्या पोटावर आणि त्याच्या कार्यांवर होतो असा परिणाम

आपल्या वयानुसार शरीरात विविध शारीरिक बदल होतात आणि पचनसंस्थेचाही त्यात समावेश आहे. हे बदल पचनक्रियेवर…

5 तास ago

हृदयासाठीही फायदेशीर आहे आवळ्याचं ज्यूस!

आयुर्वेदात आवळा हे काही उत्तम फळांपैकी एक फळ मानले जाते. आवळ्याचे जूस पिल्याने आरोग्याशी संबंधित…

5 तास ago

बळीराजाची दिवाळी काळी होऊ देणार नाही; एकनाथ शिंदेंचा निर्धार

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नवरात्र मंडळांनी पुढाकार घ्यावा; टेंभी नाक्याच्या देवीसमोर शेतकऱ्यांसाठी साकडे ठाणे: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त…

5 तास ago

ओबीसींच्या स्वतंत्र जनगणना कॉलमसाठी वडेट्टीवारांचा एल्गार! २ नोव्हेंबरला भारत बंद, १५ नोव्हेंबरला दिल्लीत शक्तिप्रदर्शन

नागपूर घोषणापत्र जाहीर; १८ राज्यांतील ओबीसी संघटनांची एकजूट, ‘नॅशनल ओबीसी न्याय मोर्चा’ची स्थापना नागपूर: जनगणनेत…

6 तास ago

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बजावला मतदानाचा हक्क; सोमेश्वर कारखान्याच्या सभासदांना मतदानाचे आवाहन

बारामती: श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा…

6 तास ago

शिरूर तालुक्यात शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक मोटारी चोरीला; गुन्हा दाखल…

न्हावरे (तेजस फडके): इनामगाव (ता.शिरुर) येथे शेतजमिनीतून दोन विद्युत मोटारी चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली…

11 तास ago