मुख्य बातम्या

शिरूरकरांना पाणीटंचाई जाणवू देणार नाही; आमदार माऊली कटके

शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरूर शहरातील पाणी टंचाईवर अखेर तोडगा निघाला असून आता नियमित पाणीपुरवठा सुरू होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून दिवसाआड पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र, आमदार माऊली आबा कटके यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे आणि तातडीच्या हालचालींमुळे कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. २० मार्चपासून सुरू झालेल्या दिवसाआड पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली होती. उन्हाळ्यात ही समस्या अधिक गंभीर होऊ नये, म्हणून आमदार माऊली आबा कटके यांनी तत्काळ पाणीपुरवठा विभाग, नगरपरिषद अधिकाऱ्यां‌ सोबत चर्चा केली. त्यानुसार, आवश्यक पाणी उपलब्ध करून देण्यात आले असून, आजपासून पूर्ववत दररोज पाणीपुरवठा सुरू होणार आहे.

आमदार कटके यांच्या पुढाकारामुळे शिरूरकरांना दिलासा मिळाला असून, उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवू नये यासाठीही पुढील नियोजन करण्यात येत आहे. “शिरूरवासीयांना पाणी टंचाईचा त्रास होऊ देणार नाही. भविष्यातही योग्य नियोजन करून सतत पाणी पुरवठा सुरू ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे आमदार माऊली आबा कटके यांनी सांगितले. नगरपरिषदेने नागरिकांना जबाबदारीने पाणी वापरण्याचे आवाहन केले आहे. पाणी साठवताना दक्षता घ्यावी, गळती टाळावी आणि गरजेपुरतेच पाणी वापरावे, असे प्रशासनाने सांगितले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

45 मिनिटे ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

52 मिनिटे ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

55 मिनिटे ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

59 मिनिटे ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

1 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

1 तास ago