ग्राम महसूल अधिकारी निवासी दाखवा आणि बक्षीस मिळवा…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील अनेक ग्राममहसूल अधिकारी (तलाठी) सजाच्या ठिकाणी राहत नसून ते पुणे, वाघोली परिसरात राहत असल्याने वेळेवर कार्यालयात पोहोचत नाहीत. त्यांच्या गैरहजेरीमुळे किंवा उशिरा येण्याने वारसनोंदी, खरेदीखताच्या नोंदी, ७/१२ उतारे आदी महत्त्वाच्या महसुली कामांसाठी नागरिकांना वारंवार कार्यालयाचे उंबरठे झिजवण्याची वेळ आली आहे. यापैकी काही तलाठी सजावर वास्तव्यास असल्याचा बनाव करून शासनाची व जनतेची फसवणूक करत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. कार्यालयात उपस्थित नसल्यावर “मिटींग आहे” हेच ठरलेले उत्तर देण्यात येते. त्यामुळे ग्राम महसूल अधिकारी निवासी दाखवा आणि बक्षीस मिळवा असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे..
अनेक नागरिकांनी सांगितले की, काही तलाठी व मंडल अधिकारी हे खाजगी कर्मचाऱ्यांमार्फत कामे करून घेत असून त्यांच्या मार्फत पैसे मागितले जात आहेत. अजब म्हणजे काही तलाठी तर गाव व क्षेत्रानुसार पैशाचे वेगवेगळे आकडे सांगत आहे. पैशांच्या मोबदल्यातच कामांना प्राधान्य दिले जात असल्याचा गंभीर आरोप काही नागरिकांनी केला आहे. नवीन ग्राममहसूल अधिकारी म्हणून नियुक्ती झालेल्या काही ग्राममहसूल अधिकाऱ्यांनी( तलाठी ) तर कहरच केला असून वारस नोंदी साठी चक्क एकरी दहा हजाराची मागणी करत केल्याचे वास्तव मलठण मंडलातील गावात समोर आले आहे .
यासर्व प्रकारांमुळे प्रशासनाची विश्वासार्हता धोक्यात आली असून, शासन व महसूल विभागाने याची तातडीने दखल घेऊन संबंधित ग्राम महसुल अधिकारी यांच्याविरोधात चौकशी करून कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे. प्रांतआधिकारी व तहसिलदार याकडे लक्ष लक्ष देऊन निवासी न राहणाऱ्या व नागरीकांना वेठीस धरणाऱ्या ग्राम महसुल आधिकारी (तलाठ्यांवर ) कारवाई करणार का हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.
खाजगी कर्मचाऱ्यांना कार्यालयात ‘नो एन्ट्री’! शिक्रापूर ग्रामपंचायतीने केला महत्वपूर्ण ठराव
ग्राम महसुल कार्यालयात खाजगी कर्मचाऱ्यांना ‘नो एन्ट्री’! करण्याबाबत शिक्रापूर ग्रामपंचायतीने ११ जून रोजी झालेल्या ग्रामसभेत एकमताने ठराव मंजूर केला. या ठरावानुसार, शिक्रापूर ग्राम महसुल अधिकारी कार्यालयात खाजगी कर्मचारी ठेवू नये, तसेच महसुली कामकाजासाठी कोतवाल नेमणुकीची अधिकृत मागणी तहसिलदारांकडे करण्यात यावी, असे ठरवण्यात आले आहे. सदर ठरावानुसार तलाठी कार्यालयातील कामकाज पारदर्शक व कायदेशीर पद्धतीने व्हावे, यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला आहे. तिथे तत्कालीन असणाऱ्या झिरो तलाठ्याने अनेक गंभीर कारनामे केल्याचे समोर आले आहे त्यामुळे हा ठराव ग्रामपंचायतने केल्याचे बोलले जात आहे.
(क्रमशः)
मुंबई: निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या बडतर्फी…
एकत्र आणि मोठे कुटुंब असणे ही केवळ संख्येची बाब असते; मात्र त्या मोठ्या कुटुंबातील माणसांची…
मुंबई: खरीप २०२६ हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये…
मुंबई: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अमरावती विभाग…
चंद्रपूर: राज्य सरकारने दुष्काळ दौऱ्याचा मोठा गाजावाजा केला. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आश्वासने…
मुंबई: राज्यातील ७५ टक्के भागात सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांना ठोस आणि भरीव…