शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील चाकण चौक परिसरात वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलेवर शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने छापा टाकत गुन्हे दाखल केले असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे.
शिक्रापूर (ता. शिरुर) येथील चाकण चौक परिसरात एक माहोला वेश्याव्यवसाय करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांना मिळाली असता सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे, महिला पोलीस नाईक प्रतिक्षा टाव्हरे, पोलीस नाईक विकास पाटील, रोहिदास पारखे, किशोर शिवणकर, होमगार्ड चंदाबाई चव्हाण यांनी सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता एक महिला शरीराचे प्रदर्शन करुन नागरिकांना अश्लील हावभाव करुन वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त करत असल्याचे दिसून आले. यावेळी पोलिसांनी तिला ताब्यात घेतले.
याबाबत महिला पोलीस नाईक प्रतिक्षा बाजीराव टाव्हरे (वय २७) रा. शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने शिक्रापूर पोलिसांनी सदर महिलेवर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार उज्वला गायकवाड करत आहे.
शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…