क्राईम

शिरुर तालुक्यात युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

मुलाची आत्महत्या पाहून आई रस्त्यावरच बेशुध्द

शिक्रापूर (शेरखान शेख): धामारी (ता. शिरुर) येथील एका युवकाने शेतातील झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. मात्र आपल्या मुलाने गळफास घेतल्याचे पाहून मुलाची आई रस्त्यावर बेशुध्द पडल्याचे दिसल्याने युवकाच्या आत्महत्येला वाचा फुटली असताना सुरज बाळासाहेब डफळ असे गळफास घेतलेल्या युवकाचे नाव आहे.

धामारी (ता. शिरुर) येथील सुरज डफळ हा शेतात जातो म्हणून शेतात गेला काही वेळाने त्याची आई मोहिनी शेतात गेली असता तिला आपल्या मुलाने शेतातील झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आल्याने ती गोंधळून घरी येत असताना रस्त्यावरच बेशुध्द पडली.

दरम्यान अक्षय डफळ हे रस्त्याने जात असताना त्यांना मोहिनी या रस्त्यावर बेशुध्द पडल्याचे दिसल्याने त्यांनी तिला शुद्धीवर आणले असता तिने शेतात घडलेल्या प्रकार सांगितला. त्यावेळी नागरिकांनी पाहणी केली असता सुरज बाळासाहेब डफळ (वय २०) रा. गवंडे वस्ती धामारी (ता. शिरुर) जि. पुणे याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस हवालदार गणेश सुतार, राहुल वाघमोडे यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला.

याबाबत अक्षय सुरेश डफळ (वय २६) रा. धामारी (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिल्याने शिक्रापूर पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल ढेकणे हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

1 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

2 तास ago

दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची साथ का सोडली? खळबळजनक गौप्यस्फोट…

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावंत मानले जाणारे माजी गृहमंत्री…

3 तास ago

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

20 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

24 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

24 तास ago