शिरूर तालुका

शिक्रापुरात वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांवर गुन्हे

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील चाकण चौक परिसरात वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांवर शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने छापा टाकत कारवाई करुन 2 महिलांवर गुन्हे दाखल केले असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील चाकण चौक परिसरात काही महिला वेश्याव्यवसाय करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांना मिळाली. त्यानंतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे, पोलीस हवालदार श्रीमंत होनमाने, अमोल दांडगे, महिला पोलीस नाईक किरण निकम, अपेक्षा टाव्हरे, पोलीस नाईक विकास पाटील, यांनी सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता दोन महिला शरीराचे प्रदर्शन करुन नागरिकांना अश्लील हावभाव करुन वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त करत असल्याचे दिसून आले. यावेळी पोलिसांच्या पथकाने दोन्ही महिलांना ताब्यात घेत कारवाई केली.

याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस नाईक अपेक्षा बाजीराव टाव्हरे (वय २७) व किरण नाना निकम (वय ३२) रा. शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने शिक्रापूर पोलिसांनी 2 महिलांवर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रशांत गायकवाड व बापू हडागळे हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

3 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

1 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

1 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

1 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

1 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

1 दिवस ago