क्राईम

मद्यधुंद ट्रक चालकाच्या धडकेत दोघे बापलेक ठार

शिक्रापूर चाकण रस्त्यावरील वाजेवाडी येथील अपघात

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील शिक्रापूर चाकण रस्त्यावरून मद्यधुंद अवस्थेत ट्रक घेऊन जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात मारुती सायबा खाडे व लक्ष्मण मारुती खाडे या बापलेकांचा मृत्यू झाला असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे श्रावण वसंत गव्हाळे या ट्रक चालकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

शिक्रापूर चाकण रस्त्यावरील वाजेवाडी येथून लक्ष्मण खाडे रामा खाडे दोघे भाऊ व त्यांचे वडील मारुती खाडे हे २० एप्रिल रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या जवळील एम एच २३ बी एफ ०६८९ या दुचाकीहून चाललेले असताना वाजेवाडी जवळील हॉटेल कावेरी समोरून जात असताना पाठीमागून मद्यधुंद अवस्थेत आलेल्या एम एच १४ जे एल ६८५३ या ट्रकने खाडे यांच्या दुचाकीला जोरदार धडक देत खाडे यांची दुचाकी काही अंतर ओढत नेली. यावेळी दुचाकीवरील तिघे बापलेक काही अंतर दुचाकीसह फरपटत गेल्याने गंभीर जखमी झाले.

दरम्यान काही नागरिकांनी सदर जखमींना उपचारासाठी शिक्रापूर येथील खाजगी रुग्णालयात नेले. मात्र उपचारापूर्वीच अपघातात मारुती सायबा खाडे (वय ५५) व लक्ष्मण मारुती खाडे (वय २८) दोघे सध्या रा. मांजरेवाडी (ता. शिरुर) जि. पुणे मूळ रा. वंजारवाडी (ता. शिरुर) कासार जि. बीड हे दोघे मयत झाले असून रामा मारुती खाडे (वय ३५) सध्या रा. मांजरेवाडी (ता. शिरुर) जि. पुणे मूळ रा. वंजारवाडी (ता. शिरुर) कासार जि. बीड हा गंभीर जखमी झाला असल्याची घटना घडली.

याबाबत रामा मारुती खाडे (वय ३५) सध्या रा. मांजरेवाडी (ता. शिरुर) जि. पुणे मूळ रा. वंजारवाडी (ता. शिरुर) कासार जि. बीड यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी श्रावण वसंत गव्हाळे रा. बालाजीनगर भोसरी पुणे याचे विरुद्ध गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजेश माने हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

3 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

1 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

1 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

1 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

1 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

1 दिवस ago