शिरूर तालुका

रांजणगाव येथे संकष्ट चतुर्थी निमित्त श्री महागणपतीच्या दर्शनाला भाविकांची गर्दी

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे-शेलार) शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती हे स्थान महाराष्ट्रातील अष्टविनायकामधील आठवे स्थान म्हणुन प्रसिद्ध असुन त्याचा लौकिक सर्व महाराष्ट्रात नवसाला पावणारा महागणपती म्हणुन आहे. आज (दि 3) रोजी संकष्टी चतुर्थी निमित्त पहाटे ५ वाजता श्रींचा अभिषेक करुन मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. तसेच आज संकष्टी चतुर्थी निमित्त श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने सामूहिक अथर्वशीर्ष पठण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

 

सध्या पावसाचे दिवस असूनही हजारो भाविकांनी अथर्वशीर्ष पठण केले. तसेच दर्शन रांगेतील भाविकांच्या हस्ते सकाळची व सायंकाळची आरती करण्यात येत आहे. तसेच श्रावण महिन्यातील ही संकष्ट चतुर्थी असल्याने मोठ्या प्रमाणावर भाविकांनी श्रींच्या दर्शनासाठी गर्दी केली होती अशी माहिती देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा स्वाती पाचुंदकर पाटील यांनी दिली.

 

आज संकष्टी चतुर्थी निमित्त भाविकांसाठी उत्तम प्रकारे जलद दर्शन व्यवस्था, खिचडी प्रसाद, पिण्याचे पाणी, सध्या पावसाचे दिवस असल्याने मंदिर परिसरात भाविकांसाठी मंडप करण्यात आला होता. श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्ट व अष्टविनायक ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यालाही मोठ्या प्रमाणात भाविकांनी प्रतिसाद दिला.

 

तसेच संकष्टी चतुर्थी निमित्त दुपारी १२ वाजता देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त डॉ ओमकार देव यांच्या हस्ते महापूजा व महानैवेद्य करण्यात आला. तसेच प्रगतशील शेतकरी नानासाहेब दिनकरराव पाचुंदकर पाटील यांच्या वतीने मंदिर गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. तसेच श्री महागणपती भजनी मंडळ, रांजणगाव गणपती यांचा भजनाचा कार्यक्रम झाला.

 

यावेळी देवस्थानचे विश्वस्त मंडळ मुख्यविश्वस्त डॉ ओमकार देव, अध्यक्षा स्वाती पाचुंदकर पाटील, उपाध्यक्ष संदिप दौंडकर, सचिव डॉ तुषार पाचुंदकर पाटील, तसेच पुजारी प्रसाद कुलकर्णी, मकरंद कुलकर्णी, राजमुद्रा पतसंस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय पाचुंदकर पाटील व देवस्थान कर्मचारी, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अंग दुखण्याची कारणे

थंड हवा थेट अंगावर लागणे: एसी किंवा फॅनची हवा जर थेट तुमच्या शरीरावर येत असेल,…

9 तास ago

केस खूपच पातळ झाले-जराही वाढत नाही? हे ५ पदार्थ खा, विंचरताना कंटाळा येईल इतके वाढतील केस

केस नैसर्गिकरित्या काळे राहण्यासाठी आणि केस वाढवण्यासाठी खास डाएट फॉलो करणंही गरजेचं असतं. केसांना पोषण…

9 तास ago

शिक्षक दिनानिमित्त गुणवंत शिक्षकांचा सन्मान; विजय सावंत यांना लायन्स क्लब शिक्षक पुरस्कार

मुंबई : शिक्षक दिनानिमित्त अभ्युदय येथील शिवाजी विद्यालयात लायन्स क्लब ऑफ मीडटाऊनच्या वतीने मुंबईतील उपक्रमशील…

9 तास ago

गणेशभक्तांसाठी शिवसेनेची मोठी घोषणा; २९०० एसटी बसची मोफत व्यवस्था

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील आपल्या गावी जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुखकर आणि आरामदायी व्हावा,…

9 तास ago

नगराध्यक्षांच्या स्वाक्षरीचा संभ्रम अखेर दूर; नमुना क्र. ६४ वर आता मुख्याधिकाऱ्यांचीच अंतिम सही

मुंबई : राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या आर्थिक व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या नमुना क्र. ६४ वर नगराध्यक्षांची…

9 तास ago

अपुऱ्या पावसाने शेतकरी संकटात; धीरज देशमुखांची सरकारकडे विशेष दुष्काळ पॅकेजची मागणी

लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…

23 तास ago