पिंपळे जगताप मध्ये दिव्यांग जनजागृती रॅली

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथे दिव्यांग दिनाच्या पार्श्वभूमीवर सेवाधाम मतिमंद निवासी विद्यालयच्या वतीने दिव्यांग जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सेवाधामच्या दिव्यांग मुलांसह महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी दिव्यांग मुलांच्या हाताला धरून सहभाग घेतला होता.

पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथे सेवाधाम मतिमंद निवासी विद्यालयच्या वतीने मुख्याध्यापक पवन कट्यारमल यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग सप्ताहच्या निमित्ताने दिव्यांग जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरपंच सोनाली नाईकनवरे, रेश्मा कुसेकर, केंद्रप्रमुख विश्वास सोनवणे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक विलास भोंगळे, महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यालयचे मुख्याध्यापक वसंत रणशिंग, सचिव विश्वास जगताप, ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष रमेश टाकळकर, रामचंद्र टाकळकर, अशोक नाईकनवरे, सोमनाथ सोंडेकर यांसह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी दिव्यांग मुलांच्या हाताला धरून त्यांना रॅलीमध्ये सहभागी करुन घेत हातामध्ये हात घ्या, दिव्यांगांना साथ द्या अशा घोषणा दिल्या तर मुख्याध्यापक पवन कट्यारमल यांनी दिव्यांग प्रतिबंधात्मक उपाययोजना या विषयावर जनजागृती माहिती दिली असून नृसिंह कुलकर्णी यांनी दिव्यांगांसाठी असलेल्या योजनांची माहिती उपस्थितांना दिली.

तसेच पिंपळे जगताप ग्रामपंचायतीच्या वतीने उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना फळे वाटप करण्यात आले तसेच उद्योजक मिलिंद सुक्रे यांच्या वतीने सर्व दिव्यांग मुलांना दिव्यांग दिनाच्या निमित्ताने उबदार कपड्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक पवन कट्यारमल यांनी सर्वांचे आभार मानले.