शिरूर तालुका

पिंपळे जगतापच्या कचऱ्याची विल्हेवाट लावा…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ग्रामपंचायत कडे मागणी

शिक्रापूर (शेरखान शेख): पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथे मुख्य रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढीग साचल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असल्याने येथील कचऱ्याची विल्हेवाट लावत ठोस उपाययोजना करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ग्रामपंचायत कडे करण्यात आली आहे.

पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील शिक्रापूर चाकण रस्त्यासह इतर ठिकाणी व्यवसायिक कचरा टाकत असल्याने अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचून दुर्गंधी पसरली आहे.

कचरा अनेकदा पेट घेत असल्याने वायू प्रदूषण देखील होत असल्याने येथील कचऱ्याची विल्हेवाट लावत कायमस्वरुपी उपाययोजना करण्याबाबतची मागणी करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शाम बेंडभर, संतोष सोंडेकर, गणेश नाईकनवरे, अजिंक्य तांबे, भूषण शितोळे यांसह आदींनी ग्रामपंचायत कार्यालयात निवेदन देत सदर कचरा प्रश्न सोडवण्याची मागणी केली आहे.

पिंपळे जगताप ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी मिलिंद केंज यांच्याशी संपर्क साधला असता ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत या प्रश्नाबाबत चर्चा करुन मार्ग काढला जाईल, असे ग्रामविकास अधिकारी मिलिंद केंज यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

1 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

1 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

1 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

2 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

3 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago