क्राईम

शिरुर तालुक्यातील महाविद्यालयीन युवतीची होस्टेलमध्ये आत्महत्या…

शिक्रापूर (शेरखान शेख): जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथील श्री छत्रपती संभाजी राजे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या होस्टेलमध्ये राहणाऱ्या सानिका बबन यनभर महाविद्यालयीन युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथील छत्रपती संभाजीराजे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सानिका यनभर ही बारावीचे शिक्षण घेत असून ती संस्थेच्या हॉस्टेल मध्येच राहत होती. सायंकाळच्या सुमारास सानिकाच्या मैत्रिणी बाहेर गेलेल्या असताना सानिका होस्टेलच्या रुममध्ये एकटीच होती काही वेळाने मैत्रिणी परत आल्या असता दरवाजा बंद होता. त्यामुळे त्यांनी सानिकाला आवाज दिला मात्र आतून कोणताही प्रतिसाद येत नसल्याने तिच्या मैत्रिणींनी शेजारील नागरिकांना याबाबत माहिती दिली.

त्यावेळी काही नागरिकांनी दरवाजा तोडून आत मध्ये पाहिले असता सानिकाने छताला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. यावेळी तिला उपचारासाठी शिक्रापूर येथील रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी सानिका बबन यनभर (वय १७) रा. बर्केगाव ता. हवेली जि. पुणे हिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

याबाबत नवनाथ गुलाब सांवत (वय ३९) रा. कुंजीरवाडी ता. हवेली जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिले असल्याने शिक्रापूर पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बापू हडागळे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

श्री महागणपतीच्या दर्शन व्यवस्थेवर भाविकांचा संताप; ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांमधील समन्वयाचा अभाव चव्हाट्यावर

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : ‘देवाच्या दारी सर्व भक्त समान’ असा संदेश समाजाला देणाऱ्या धार्मिक…

11 तास ago

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

3 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

3 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

3 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago