शिक्रापूर: सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु झालेले असताना सापांच्या प्रजननाचा देखील काळ असल्याने घोणस व नाग या विषारी सापांची पिल्ले घराच्या आजूबाजूला आलेली असल्याने नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन इंडिया बुक रेकॉर्डचे सर्पमित्र शेरखान शेख यांनी केले आहे.
सध्या सापांच्या प्रजननाचा काळ असल्याने सापांच्या पिल्लांचा जन्म झालेला असून पाण्यामुळे सापांना निवारा नसल्यामुळे सापांसह सापाची पिल्ले निवाऱ्याच्या शोधात घराच्या आजूबाजूला आलेली असतात. घराच्या परिसरात आल्यानंतर सापांची पिल्ले घराबाहेरील जागा तसेच बुटांचा देखील आसरा घेतात. मात्र नागरिक घराबाहेर पडताना बुटांचे निरीक्षक न करताच बुट पायात घालतात. मात्र त्यामध्ये सापाचे पिल्लू बसलेले असल्यास सर्पदंशाची दुर्घटना देखील होऊ शकते, यापूर्वी शिक्रापूर येथे कित्येकदा नागरिकांच्या तसेच लहान मुलांच्या बुटांमध्ये विषारी सापाची पिल्ले बसल्याचे निदर्शनास आलेले आहे.
मुले घराच्या ओट्यावर अभ्यास करत असल्यास तेथील सतरंजी, दप्तर यांचा देखील सापांची पिल्ले आधार घेतात तर लहान मुळे खेळत असलेल्या ठिकाणी कित्येकदा सापांची पिल्ले निदर्शनास येतात त्यामुळे नागरिकांनी या काळामध्ये सापांपासून होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी विशेष खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे आवाहन इंडिया बुक रेकॉर्डचे सर्पमित्र शेरखान शेख यांनी केले आहे.
कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…
शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…
पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…
माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…
पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना; २०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करणार मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील…