शिरूर तालुका

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या शिरुर तालुका महिला युवती कार्याध्यक्षपदी अश्विनी जाधव यांची निवड

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे-शेलार) कारेगाव येथील उद्योजिका अश्विनी जाधव यांची शुक्रवार (दि 12) रोजी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या शिरुर तालुका महिला युवती कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. शिरुर हवेलीचे कार्यसम्राट आमदार ॲड अशोक पवार यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

 

शुक्रवार (दि 12) रोजी वडगाव रासाई येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या बुथ कमिटी आणि सोशल मिडीयाच्या कार्यकर्त्यांचीं बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी आमदार अशोक पवार यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

 

यावेळी माजी जिल्हा परीषद सदस्य सुजाता पवार, रामलिंग महिला पतसंस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या शिरुर तालुका महिलाध्यक्षा विद्या भुजबळ, युवती तालुकाध्यक्षा संगीता शेवाळे, शिरुर शहर महिलाध्यक्षा स्मिता कवाद, शिरुर शहर युवती अध्यक्षा गीता आढाव, राणी शिंदे, रुपाली बोर्डे, निर्मला ढोकले, अनिता गवारे, बेबी शितोळे, संगिता शेवाळे, मनिषा तरटे, वर्षा जगधने आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

 

या निवडीनंतर बोलताना अश्विनी जाधव म्हणाल्या, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची ध्येय धोरणे तळागाळातील सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी यापुढे खासदार डॉ अमोल कोल्हे शिरुर-हवेलीचे आमदार ॲड अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असुन सर्वसामान्य महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी यापुढे पक्षाच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे.

कारेगावच्या उद्योजिका अश्विनी जाधव महिला दिनानिमित्त वुमन स्टार रायझिंग अवार्डने सन्मानित

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सावधान; स्वीट होम मध्ये मिठाई घेताय जरा जपुन,रांजणगाव येथील स्वीट होमच्या मिठाईत सापडली मेलेली अळी

रांजणगाव गणपती (तेजस फडके) सध्या फास्ट फूड खाण्याच प्रमाण वाढलं असुन पुणे-नगर महामार्गाच्या येथे रस्त्याच्या…

16 तास ago

शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा भीषण स्फोट…

शिक्रापूर : शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना आज (रविवार) पहाटे…

2 दिवस ago

माहेर संस्थेमुळे दोन मनोरुग्ण महिलांची कुटुंबासोबत भेट मृत समजुन एका महिलेचे केले होते धार्मिक विधी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे मानसिक संतुलन हरवलेल्या दोन महिलांवर योग्य औषधोपचार…

2 दिवस ago

पुणे-सोलापूर महामार्गावर बँड पथकावर होर्डिंग कोसळल्याने एक घोडा जखमी

पुणे (प्रतिनिधी) सध्या राज्यात अवकाळी पाऊसामुळे अनेक ठिकाणी होर्डींग कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य…

2 दिवस ago

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…

5 दिवस ago

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…

1 आठवडा ago