शिरूर तालुका

उद्योजक व व्यवसायीकांनी पोलिसांना सहकार्य करावे…

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांचे आवाहन

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे एक जानेवारी रोजी होणाऱ्या शौर्यदिनाच्या कार्यक्रमासाठी परिसरातील उद्योजक तसेच व्यवसायिक मोठ्या प्रमाणात सहकार्य करत असल्याने प्रत्येक वर्षी होणारा कार्यक्रम शांततेत पार पडत असतो अशाच पद्धतीने कार्यक्रम शांततेत पार पडण्यासाठी परिसरातील उद्योजक व व्यवसायीकांनी नेहमीप्रमाणे सहकार्य करावे, असे आवाहन पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी केले आहे.

कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे एक जानेवारी रोजी होणाऱ्या कार्यक्रमाच्या बंदोबस्त साठी उपस्थित असणाऱ्या पोलिसांना अन्न पाण्यासह निवासाची व्यवस्था करणाऱ्या कंपनीचे प्रतिनिधी, मंगलकार्यालय, शाळेच्या संस्था चालक यांसह आदींचा सन्मान करण्यात आला.

यावेळी बोलताना पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी सदर आवाहन केले आहे याप्रसंगी अप्पर पोलीस अधिक्षक मितेश घट्टे, आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी, राहुल धस, श्रीकांत पाडोळे, पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांसह आदी अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

11 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

11 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

11 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

1 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago