शिरूर तालुका

शेतकऱ्यांनी ई पिक पाहणी ॲपचा वापर करणे गरजेचे; सुशीला गायकवाड

शिक्रापूरच्या शालेय विद्यार्थ्यांनी घेतली ई पिक पाहणी ॲपची माहिती

शिक्रापूर (शेरखान शेख): शेतकऱ्यांना शेतातील पिकांना येणारे अनुदान तसेच नैसर्गिक आपत्तीनंतर मिळणारी शासकीय मदत मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी ई पिक पाहणी ॲपचा वापर करणे गरजेचे असल्याचे तलाठी सुशीला गायकवाड यांनी सांगितले.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील काळभैरवनाथ माध्यमिक विद्यालय कोयाळी पुनर्वसन येथे शालेय मुलांना नुकतीच तलाठी सुशीला गायकवाड यांच्या वतीने ई पिक पाहणी ॲपची माहिती देण्यात आली. यावेळी प्राचार्य गणेश खेडकर, ग्रामपंचायत सदस्य त्रिनयन कळमकर, दत्तात्रय लांडगे, मीना साळवे यांसह आदी उपस्थित होते.

दरम्यान शालेय मुलांना सदर ॲपबाबत माहिती देताना शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात उभे राहून शेतातील ऊस, ज्वारी, बाजरी, मुग, कांदा, बटाटा यांसह सर्व पिकांची माहिती या ई पिक पाहणी ॲपवर भरल्यास काही आपत्ती निर्माण झाल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लवकर मिळू शकते. त्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची माहिती ई पिक पाहणी ॲपवर असणे गरजेचे असल्याचे तलाठी सुशीला गायकवाड यांनी सांगितले. यावेळी प्राचार्य गणेश खेडकर यांनी सर्वांचे आभार मानले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड पाटबंधारे विभागाची भुमिका संशयास्पद…? पोलिसांना दिलेल्या पत्रात फक्त ठराविक वाळु माफियांची नावं

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या जलाशय परिसरात दिवसाढवळ्या आठ ते नऊ यांत्रिक बोटिंच्या साह्याने बेसुमार…

8 तास ago

तीन हजारांच्या पारितोषिकासाठी अनवाणी धावली आई; आता देशभरातून मदतीचा हात

बीड : मुलींच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी अवघ्या तीन हजार रुपयांच्या पारितोषिकाच्या आशेने अनवाणी धावत, हातात…

1 दिवस ago

हेक्टरी १ लाखांची मदत, सरसकट कर्जमाफी आणि विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करण्याची हर्षवर्धन सपकाळांची मागणी

मुंबई/बुलढाणा: मागील ४० ते ४५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके करपून गेली असून राज्यातील शेतकरी गंभीर…

1 दिवस ago

शिरूर तालुक्यात क्रिकेट खेळण्यावरून तुफान राडा; बॅट-स्टंपने मारहाण; पाच जणांना अटक…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याची घटना…

2 दिवस ago

पाबळ-कान्हूर-केंदूर! निवडणूक आली की पाण्याची चर्चा; टंचाई मात्र कायमच!

पाबळ (सुनिल जिते) : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील पाबळ, कान्हूर मेसाई आणि केंदूर परिसरात यंदा…

2 दिवस ago

रांजणगावमध्ये कोयत्याने जीवघेणा हल्ला करणारे आरोपी 12 तासात अटक LCB आणि रांजणगाव MIDC पोलिसांची संयुक्त कारवाई

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव येथील वामन वाईन्ससमोर किरकोळ वादातून तरुणावर आणि त्याला वाचवण्यासाठी मध्ये…

2 दिवस ago