शिरूर तालुका

निमोणे येथे विहिरीत एका युवकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

निमोणे (तेजस फडके): निमोणे (ता. शिरुर) येथील निलायम हॉटेलच्या पाठीमागे असणाऱ्या एका विहिरीत पडून सुनिल शिवाजी थोरात (वय २८ वर्षे) रा. गुनाट (ता. शिरुर) जि. पुणे हा युवक मरण पावला असुन नक्की हा मृत्यू कशामुळे झाला हा घातपात आहे की अजुन काही याची चौकशी पोलिस करत आहेत. याबाबत बाप्पु शिवाजी थोरात यांनी शिरुर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.

याबाबत शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुनिल शिवाजी थोरात हा गेल्या सहा महिन्यांपासुन त्याचा मावसभाऊ सतिश सुरेश दवणे (रा. सुरोडी, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) याच्याकडे राहत होता. दि 1 एप्रिल रोजी सायंकाळी 7 च्या सुमारास तो गुनाट येथे आला होता. त्यानंतर 2 एप्रिल रोजी सकाळी 11:45 च्या सुमारास फिर्यादी बाप्पु थोरात यांना गावातील एकनाथ थोरात यांनी फोन करुन तुझा लहान भाऊ सुनिल याचा मृतदेह निमोणे येथील निलायम हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या राजेंद्र पोपट जाधव (रा. निमोणे) यांच्या सामाईक विहरीमध्ये तरंगत असल्याचे सांगितले.

त्यानंतर बाप्पु शिवाजी थोरात यांनी निमोणे येथे जाऊन पाहणी केली असता तो त्यांचा भाऊच असल्याची खात्री पटली. त्यानंतर त्यांनी शिरुर पोलिस स्टेशन येथे धाव घेत फिर्याद दाखल केली. शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुजाता पाटील या करत आहेत.

निमोणे येथे पोलिस चौकीची गरज…?

निमोणे हे शिरुर-काष्टी रस्त्यावर निमोणे हे महत्वाचे गाव असुन त्या ठिकाणी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक, स्टेट बँक, प्राथमिक आरोग्य केंद्र, तसेच आठवडे बाजार भरतो. तसेच या ठिकाणी सुमारे 25 ते 30 विटभट्या आहेत. तसेच निमोणे गावात मोठया प्रमाणात अवैध गावठी दारुची विक्री तसेच इतर अवैध धंद्याना ऊत आला असुन या ठिकाणी चोऱ्या, भांडण, मारामाऱ्या याचं प्रमाण वाढलं आहे. सुमारे दोन महिन्यांपुर्वी निमोणे गावात आधी एक खुन, त्यानंतर एक आत्महत्या झाली असुन या गुन्ह्यांचा तपास अजुनही लागलेला नाही. त्यातच आता गुनाट येथील युवकाचा निमोणे येथील हॉटेल निलायमच्या मागे विहिरीत पडून मृत्यू झाल्याने हा घातपात नाही ना अशी सगळीकडे दबक्या आवाजात चर्चा चालु आहे. त्यामुळे निमोणे येथील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिस चौकी असणे गरजेचे आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…

1 दिवस ago

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…

4 दिवस ago

तळेगाव ढमढेरे ते एल अँड टी फाटा रस्त्यावरील ‘ते’ बॅनर ठरत आहेत चर्चेचा विषय

तळेगाव ढमढेरे (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे गावातील अतिशय महत्त्वाचा तसेच वर्दळीचा आणि पुणे-नगर…

4 दिवस ago

Video; तळेगाव-न्हावरे रस्त्यावर नियंत्रण सुटल्याने मालवाहू ट्रक उलटला; चालक गंभीर जखमी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव-न्हावरे रस्त्यावर (NH548D) न्हावरेच्या बाजुने तळेगाव ढमढेरेच्या दिशेने जाणारा भरधाव…

4 दिवस ago

आज दिवसभर प्रेक्षकांना ZEE TV वर ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ चित्रपटाची पर्वणी

शिरुर (तेजस फडके) आज (दि 12) मे रोजी दिवसभर झी वाहिनीच्या विविध चॅनलवर स्वराज्याचे दुसरे…

5 दिवस ago

जेव्हा सगळे शेपूट घालुन बसले होते. तेव्हा हा पठ्या भांडलाय तुमच्यासाठी; डॉ कोल्हे यांचा अजित पवारांना टोला

शिरुर (तेजस फडके) ज्या भारतीय जनता पक्षाची तळी घेऊन आता तुम्ही एका शेतकऱ्याच्या पोराला पाडायला…

6 दिवस ago