शिरूर तालुका

शेतकऱ्यांच्या शेतीसाठी दिवसा विजेच्या मागणीला महावितरणचा खोडा…

बिबटयाच्या सततच्या हल्ल्याने शेतकरी बेजार…

शिरुर (अरुणकुमार मोटे): ओ साहेब… शेतीला दिवसा वीज देता का वीज… अशी आर्त हाक शेतकरी अनेक दिवसांपासून देत असून ही मागणी महावितरणकडून अद्याप पुर्ण होऊन शकल्याने रात्रीच्या वेळी अश्रू ढाळत जीव मुठीत धरून शेताला पाणी देण्यासाठी जात आहे.

शिरुर तालुक्यात बिबट्याचे वाढते हल्ले, सर्पदंश आणि बदलते हवामान या अस्मानी संकटांचा सामना शेतकरी गेली अनेक वर्ष करत आहे. बिबट्याच्या हल्ल्यामुळे बेट भागातील जांबुत, पिंपरखेड परीसरातील ४ जणांना आपले प्राण गमवावा लागले आहे. तर शेकडो पशूधनावर हल्ला करून ठार केले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे राहीले असून रात्रीच्या वेळी अक्षरश: जीव धोक्यात घालून शेतीला पाणी दयावे लागत आहे. रात्रीच्या वेळी शेतकरी शेतीला पाणी देण्यासाठी गेल्यावर तो परत सुखरुप घरी येईल की नाही याची चिंता घरच्यांना कायम सतावत असते.

बिबटयाच्या, सर्पदशांच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी शेताला दिवसा पाणी देण्यासाठी दिवसा वीज हवी असून वारंवार मागणी होऊनही महावितरण कंपनी या मागणीकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत आहे. शिरूर तालुक्यातील बेट भाग हा बिबट प्रवण क्षेत्र परिसर आहे. बिबट्याचा वावर हा मोठ्या प्रमाणावर मानवी वस्तीत वाढला असून जीव मुठीत धरुन रात्रपाळीत शेताला पाणी दयावा लागत आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून या भागातील आमदार, खाजदार व इतर राजकीय नेत्यांनी अतिशय प्रभावीपणे दिवसा विजेची मागणी केली असून अद्याप या मागणीला महावितरणकडून केराची टोपली दाखवली जात आहे. अजून किती जणांचे बळी गेल्यावर दिवसा वीज देणार असा प्रश्न या भागातील शेतकरी विचारत आहे.बिबट्याच्या हल्ल्याची घटना जीवावर बेतली तर महावितरणचे संबंधीत अधिकारी जबाबदार असतील.अशा प्रकारच्या संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून उमटत आहेत.

शिरूर तालुक्यातील बेट भाग हा बिबट प्रवण क्षेत्र परिसर आहे. यामुळे या परिसरात शेतीसाठी दिवसा वीज मिळावी, अशी मागणी वारंवार करूनही ती पूर्ण न करता वीज कनेक्शन कट करण्याचे धोरण अवलंबविले गेले आहे. बिबट्याचा वावर हा मानवी वस्तीत वाढला असून घराचा वीजपुरवठा खंडित झाल्याने अंधाराचा फायदा घेऊन मनुष्यावर हल्ला होण्याची शक्यता आहे. बिबट्याच्या हल्ल्याची घटना जीवावर बेतली तर महावितरणचे संबंधीत अधिकारी जबाबदार असतील, अशा प्रकारच्या संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून उमटत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘मतदारांची नावे वगळल्याचा’ आरोप; ज्ञानेश कुमार यांच्या अटकेच्या मागणीसाठी काँग्रेसचे २८ सप्टेंबरला राज्यभर आंदोलन

मुंबई: निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या बडतर्फी…

10 तास ago

मोतीबन-कोठारी परिवार म्हणजे एकत्र कुटुंब, आदर्श कुटुंब!

एकत्र आणि मोठे कुटुंब असणे ही केवळ संख्येची बाब असते; मात्र त्या मोठ्या कुटुंबातील माणसांची…

12 तास ago

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; विविध सवलती लागू

मुंबई: खरीप २०२६ हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये…

12 तास ago

अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसची निवडणूक समिती जाहीर; ११ जणांवर जबाबदारी

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अमरावती विभाग…

12 तास ago

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा मदतीचा जीआर; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

चंद्रपूर: राज्य सरकारने दुष्काळ दौऱ्याचा मोठा गाजावाजा केला. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आश्वासने…

12 तास ago

दुष्काळ जाहीर करून चालणार नाही; हेक्टरी १ लाख रुपये तातडीने खात्यात जमा करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील ७५ टक्के भागात सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांना ठोस आणि भरीव…

12 तास ago