शिक्रापूर (शेरखान शेख): मुखई (ता. शिरुर) येथील कै. रा. गे. पलांडे आश्रम शाळेतील मुलांसाठी शाळेच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण उपक्रम सातत्याने राबवले जात असताना शाळेतील उपक्रम व विद्यार्थ्याच्या सुविधांची पाहणी करण्यासाठी नुकतेच काही परदेशी पाहुण्यांनी आश्रम शाळेला भेट दिल्याची माहिती प्राचार्य तुकाराम शिरसाट यांनी दिली आहे.
मुखई (ता. शिरुर) येथील कै. रा. गे. पलांडे आश्रम शाळेत वेगवेगळे उपक्रम राबवले जात असताना काही दिवसांपूर्वी पाबळ येथील विज्ञान आश्रमच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या मल्टीस्किल फाउंडेशन कोर्स साठी शाळेला गॅशी फायर, बायोगॅस, सोलर लाईट, सोलर वॉटर हिटर यांसह आदी प्रोजेक्ट इंग्लड, जर्मनी, जपान, रशिया, आफ्रीका, ऑस्टोलिया अशा विविध देशातील परदेशी पाहुण्याच्या सहकार्याने देऊ केले आहेत. त्या प्रोजेक्टची पाहणी करुन शाळेला भेट देण्यासाठी जर्मणीचे प्रोफेसर फ्रॉन्क मर्टीन यांनी त्यांच्या 70 सहकाऱ्यांसह शाळेला भेट देत शाळेसाठी प्रोजेक्टची पाहणी व निरीक्षण करत मुलांशी संवाद साधला. यावेळी कार्याध्यक्ष अशोकराव पलांडे, मुंबई येथील पवई आय आय टी चे प्रा. आनंद राव, रणजीत शानबाग, डॉ अरुण दिक्षित, डॉ, योगेश कुलकर्णी प्रा. तुकाराम शिरसाट यांसह आदी उपस्थित होते.
दरम्यान परदेशी पाहुण्यांनी शाळेत बसून अध्यापनाचा आनंद घेतला. प्रोसेसर फ्रॉक मर्टीन यांनी शाळेतील विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक करत शाळेबाबत समाधान व्यक्त केले, सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक मनोज धिवार यांनी केले तर प्राचार्य तुकाराम शिरसाट स्वागत केले तसेच रेखा काळे यांनी आभार मानले.
शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याची घटना…
पाबळ (सुनिल जिते) : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील पाबळ, कान्हूर मेसाई आणि केंदूर परिसरात यंदा…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव येथील वामन वाईन्ससमोर किरकोळ वादातून तरुणावर आणि त्याला वाचवण्यासाठी मध्ये…
शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरातील लाटेआळी-आंबेडकरनगर परिसरात शुक्रवारी (१८) सकाळी साडे-सहाच्या सुमारास झालेल्या गोळीबारात हरिष…
शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…