शिरूर तालुका

शिरुर तालुक्यातील ह.भ.प.गणेश महाराज फरताळे यांनी दशक्रियाचे मानधन नाकारले

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरोना काळामध्ये अनेक कुटुंबातील कर्ते पुरुष मृत झाले तर काही मातेंचा मुलगा मृत झालेला असताना नुकतेच शिरुर तालुक्यातील एका मातेच्या दशक्रिया दरम्यान सदर मातेचा तरुण मुलगा कोरोनामध्ये मृत झाल्याचे समजताच ह. भ. प. गणेश महाराज फरताळे यांनी दशक्रिया विधीतील प्रवचनचे मानधन नाकारून समाजापुढे आदर्श निर्माण करुन दिला आहे.

निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील शेतकरी कुटुंबातील कै. लताबाई अरुण चव्हाण यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या दशक्रिया विधीसाठी शिरुर तालुक्यातील प्रसिद्ध प्रवचनकार ह. भ. प. गणेश महाराज फरताळे यांचे प्रवचन पार पडले.

परंतु कोरोना काळामध्ये लताबाई यांचा तरुण मुलगा गणेश चव्हाण हा मृत पावला आहे हे गणेश महाराज फरताळे यांना समजताच त्यांनी कै. लताबाई यांना मुलगा नाही परंतु मीच त्यांचा मुलगा होऊन त्यांना प्रवचन रुपी सेवेतून श्रद्धांजली वाहतो सदर दशक्रिया मध्ये मी कोणत्याही प्रकारचे मानधन स्वीकारणार नाही, मानधनाचे पैसे गणेश चव्हाण यांच्या मुलींच्या शैक्षणिक कार्यात खर्च करावे हि अपेक्षा व्यक्त करत त्यांचे कार्य प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले आहे, तर गणेश महाराज फरताळे यांनी प्रवचनचे मानधन नाकारून समजात आदर्श निर्माण केला आहे.

दरम्यान त्यांच्या या कृत्याचे दशक्रिया साठी जमलेल्या नागरिकांनी कौतुक देखील केले तर चव्हाण कुटुंबाचा घटक या नात्याने ग्रामपंचायत सदस्य विक्रम चव्हाण यांनी गणेश महाराज फरताळे यांच्या सहकार्या बद्दल ऋण व्यक्त केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी जनजागृतीच प्रभावी ‘फायरवॉल’!

आशिष शेलार यांच्या हस्ते ‘बी सायबर स्ट्रीट स्मार्ट’ मोहिमेचा शुभारंभ; एआय फसवणूक, डीपफेक, डिजिटल अटकसह…

8 तास ago

ओबीसींच्या हक्कांसाठी जातनिहाय जनगणना गरजेची; राहुल गांधींच्या भूमिकेमुळे मोदी सरकारला निर्णय घ्यावा लागला

मुंबई: जातीव्यवस्थेने समाजात जाती-जातींमध्ये संघर्ष निर्माण केला असून, या व्यवस्थेत ओबीसी समाजाला खालचे स्थान देऊन त्यांचा…

8 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या धरपकडीवरून काँग्रेस आक्रमक; सागर साळुंके यांचा फडणवीस सरकारवर गंभीर आरोप

मुंबई, दि. ५ ऑक्टोबर २०२६ : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला ४८ दिवस उलटले…

12 तास ago

टिळक भवनमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांची धरपकड; पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची नसीम खान यांची मागणी

मुंबई: आदिवासी विद्यार्थ्यांना आश्रमशाळांमध्ये मूलभूत सुविधा, दर्जेदार जेवण आणि पिण्याचे पाणी मिळत नसल्याच्या प्रश्नावर नाशिक ते…

12 तास ago

१७४ प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित मच्छार यांचे शिंदेंकडून कौतुक; मोदींबद्दलच्या आदराचाही केला उल्लेख

मुंबई: जीवघेण्या संकटाच्या क्षणी स्वतःचा जीव धोक्यात घालून विमानातील १७४ प्रवाशांचे प्राण वाचविणारे कॅप्टन स्मित…

12 तास ago

आदिवासी विद्यार्थ्यांच्या अटकेवरून काँग्रेस आक्रमक; ‘वर्षा’ बंगल्याला घेराव घालण्याचा हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

मध्यरात्री काँग्रेस कार्यालयात पोलिसांची कारवाई; सपकाळ, गायकवाड, भाई जगताप यांचा सरकारवर हल्लाबोल मुंबई: नाशिकपासून मुंबईपर्यंत…

12 तास ago