क्राईम

शिक्रापुरातून युवकाचा लॅपटॉप व मोबाईल लांबविला

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील एका मुलाच्या घरातून अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील मलठण फाटा नजीक शिक्षक कॉलनी मध्ये सिद्धेश शामकुवर हा मित्रांसमवेत राहत आहे. सकाळच्या सुमारास सिध्देशचा एक मित्र रुम मध्ये झोपलेला असताना सिद्धेश त्याचा मोबाईल घरात ठेवून कामाला गेला होता. काही वेळाने सिद्धेशचा मित्र विशाल कामावरुन घरी आला त्यावेळी दरवाजा उघडा दिसला त्यांनतर विशालने त्याचा लॅपटॉप पाहिला असता त्याला लॅपटॉप दिसला नाही. त्यामुळे त्याने इतर मित्रांना सांगून घरात पाहणी केली असता घरात ठेवलेला विशालचा लॅपटॉप व सिद्धेशचा मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याचे निदर्शनास आले.

याबाबत सिद्धेश राजरतन शामकुवर रा. शिक्षक कॉलनी मलठण फाटा शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे मूळ रा. सातगाव गुरुकुल कॉलनी रींधोरा ता. हिंगणा जि. नागपूर याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मंगेश लांडगे हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

5 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

5 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

5 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

5 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

6 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

6 तास ago