शिरूर तालुका

शिक्रापुरातील कचरा आंदोलनाबाबत ग्रामपंचायतची बैठक

शिक्रापुर (शेरखान शेख) शिक्रापुर (ता. शिरुर) येथील ग्रामस्थांनी चार दिवसांपासून कचरा बंद आंदोलन सुरु केल्याने नागरिकांच्या घरात कचरा साठून राहिला असल्याचे समोर येत असुन आता ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची कचरा आंदोलनाबाबत नुकतीच बैठक संपन्न झाली आहे.

शिक्रापूर येथील ग्रामस्थांनी चार दिवसांपासून कचरा बंद आंदोलन सुरु केले असल्यामुळे ग्रामपंचायतच्या कचरा गाड्या देखील बंद झाल्याने नागरिकांच्या घरातील कचरा घरातच साठवला गेला. मात्र त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. तर नुकतीच ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची याबाबत बैठक संपन्न झाली. यावेळी सरपंच रमेश गडदे, उपसरपंच मयूर करंजे, ग्रामविकास अधिकारी शिवाजी शिंदे, माजी उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य रमेश थोरात, सुभाष खैरे, विशाल खरपुडे, त्रिनयन कळमकर, प्रकाश वाबळे, सारिका सासवडे, सोमनाथ भुजबळ, गणेश लांडे यांसह आदी उपस्थित होते.

दरम्यान यावेळी झालेल्या बैठकीत काही ठिकाणी भाडे तत्वावर कचरा प्रकल्पासाठी जागा घेऊन प्रकल्प उभारण्याबाबत चर्चा झाली परंतु अनेक ठिकाणहून नागरिकांनी आमच्या भागात कचरा प्रकल्प नको म्हणून ग्रामपंचायतकडे तक्रारी अर्ज दाखल केले त्यामुळे अडचण निर्माण झाली असताना अखेर एका ठिकाणी भाडेतत्वावर शेड घेण्याच्या चर्चेवर शिक्कामोर्तब झाले मात्र आता पुढे काय होणार याकडे सर्व नागरिकांसह ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

सध्या ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची बैठक झाली असून एका ठिकाणी रेडी असलेले शेड भाडेतत्वावर घेण्याचे ठरले असून त्याबाबत लवकरच कार्यवाही केली जाणार असून सध्याचा गोळा होणारा कचरा एका अन्य ठिकाणी संकलित करण्याचे काम सुरु करण्यात आले असल्याचे ग्रामविकास अधिकारी शिवाजी शिंदे यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

15 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 दिवस ago