रांजणगाव जमीन गैरव्यवहार प्रकरणातील अपील हाय कोर्टाने फेटाळले

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथील गावठाणातील कोट्यवधी रुपये किमतीची बहात्तर गुंठे जमीन हडपल्याचा आरोप करत तत्कालीन ग्रामपंचायत प्रशासनाने महसुलमंत्र्यांकडे धाव घेतली असता सदर जागेवर सरकार नाव टाकण्याचे आदेश महसूलमंत्र्यांनी दिले होते. या आदेशाविरोधात आनंदराव दिनकर पाचुंदकर यांनी हायकोर्टात अपील केले होते. हायकोर्ट मुंबई यांनी दि. १९ मार्च २०२५ रोजी आनंदराव दिनकर पाचुंदकर यांचे अपिल फेटाळले असल्याची माहिती सरपंच सुवर्णा वायदंडे व उपसरपंच श्रीकांत पाचुंदकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

तसेच सन २००८ ते २००९ पासून या प्रकरणाशी संबंधित सर्व अधिकारी व पदाधिकारी कर्मचारी दोषी ठरविले असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशीही मागणी सरपंच वायदंडे आणि उपसरपंच पाचुंदकर यांनी केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, रांजणगाव गणपती (ता. शिरुर) येथील गावठाणातील कोट्यवधी रुपये किमतीची सुमारे ७२ गुंठे जमीन हडपण्याचा प्रकार उघडकीस आला होता व या जमिनीवरील आनंदराव दिनकर पाचुंदकर यांचे नाव काढून टाकून राज्य सरकारचे नाव दाखल करण्याचे आदेशही तत्कालीन महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले होते.

सध्याच्या बाजारभावाप्रमाणे सुमारे ७२ गुंठे जागेची किंमत कोट्यावधी रुपये होत असल्याचा दावा त्यांनी केला. याबाबत सरपंच व उपसरपंच यांनी सांगितले की, ग्रामपंचायतीकडील सन १९६०- ६१ चे रेकॉर्ड भिजल्याचा गैरफायदा उठवीत राजमुद्रा पतसंस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय पाचुंदकर यांनी बनावट रेकॉर्ड बनवून ८अ मध्ये खाडाखोड व पाने चिकटऊन आनंदराव पाचुंदकर यांचे वय १२ वर्ष असतानाही गावठाणातील सुमारे ७२ गुंठे मिळकतीवर सिटी सर्वे मार्फत आनंदराव पाचुंदकर यांचे नाव नोंदविले. याच काळात दत्तात्रय पाचुंदकर यांच्या पत्नी साडेतीन वर्षे सरपंच, तर नंतर जिल्हा परिषद सदस्यही होत्या.

दरम्यान २०१९ ला ग्रामपंचायतीची सत्ता आमच्या ताब्यात आल्यानंतर गाव नमुना आठमध्ये खाडाखोड करुन केलेला जमीन बळकविण्याचा प्रकार आमच्या लक्षात आला. महाराष्ट्र शासनाची ही जमीन वाचविण्यासाठी आम्ही तत्कालीन महसूलमंत्र्यांकडे पत्रव्यवहार केला. या प्रकरणाचा पाठपुरावा केला. महसुलमंत्र्यांसमोर झालेल्या सुनावणीनंतर त्यांनी संबंधित मिळकतीतून आनंदराव पाचुंदकर यांचे नाव वगळून शासनाचे नाव दाखल करण्याचे आदेश दिले होते. या आदेशा विरोधात आनंदराव दिनकर पाचुंदकर यांनी दाद मागण्यासाठी हायकोर्टात अपील केले असता त्यांचे अपील कोर्टाने दि. १९ मार्च २०२५ रोजी फेटाळले असल्याची माहिती सरपंच सुवर्णा वायदंडे व उपसरपंच श्रीकांत पाचुंदकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. या पत्रकार परिषदेला ग्रामपंचायत सदस्य अशोक शेळके, निलेश लांडे, अनिल दुंडे, नेताजी फंड, भानुदास शेळके आदी उपस्थित होते.

माननीय उच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर आनंद व्यक्त करणाऱ्यांनी कदाचित ते निकालपत्र व्यवस्थित वाचले नसावे किवा कदाचित ते निकालपत्र इंग्रजी भाषेत असल्याने त्यांना ते कळाले नसावे. मुळात या आमच्या वडिलोपार्जित जमिनी आहेत आणि त्यासंदर्भातील सिटी सर्व्हे संदर्भातील पुर्तता हि जुलै २०१३ सालीच झाली होती. माननीय उच्च न्यायालयाने आम्हाला सहाय्यभुत ठरतील अशा अनेक बाबी त्या निकालपत्रात नमुद केल्या आहेत. विरोधात गेलेल्या बाबींसंदर्भात आम्ही आमच्या कायदेतज्ञांशी चर्चा करून ४ ते ५ पर्यायांची चाचपणी करत आहोत. आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास असुन केवळ घाणेरड्या राजकारणापायी आमच्या वडिलोपार्जित जमिनी संदर्भात खोटेनाटे पुरावे उभे करुन न्यायव्यवस्थेचा वेळ वाया घालविणाऱ्यांबद्दल आम्हाला किव येते. भविष्यात आम्हाला योग्य तो न्याय मिळेल अशी आम्हाला खात्री आहे.
दत्तात्रय पाचुंदकर
अध्यक्ष; राजमुद्रा पतसंस्था

शिरुर तालुक्यातील वयोवृद्ध शेतकऱ्याने महीलांना घडविले मोफत एकविरा देवी तसेच प्रतिशिर्डी चे दर्शन

कारेगाव येथील आठवडे बाजारात शेतकऱ्यांकडुन जबरदस्तीने पैसे वसुली; खंडणीचा गुन्हा दाखल

शिरुर; कोयत्याने वार करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न; सात आरोपींना २४ तासांच्या आत अटक 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पिंपरखेडमध्ये शिव पाणंद शेत रस्ते चळवळीच्या समन्वयाने शेतरस्ता खुला

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर. तालुक्यातील पिंपरखेड येथील बोंबे वस्तीवर जाणारा शेतरस्ता दीड वर्षांपासून वादग्रस्त ठरला…

15 तास ago

शिरुर तालुक्यात कंपनीतुन तब्बल १६ लाखांची कॉपर ट्यूब चोरी; औद्योगिक सुरक्षेवर प्रश्नचिन्ह…?

न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील करडे हद्दीत असलेल्या एस. व्ही. एस. रेफकॉम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतून…

16 तास ago

कारेगावात “शिवतीर्थ प्रतिष्ठान” तर्फे भव्य सार्वजनिक नवरात्रोत्सव

रांजणगाव गणपती (तेजस फडके) कारेगाव (ता. शिरुर) येथे संस्कृती आणि कला यांचा संगम घडवणारा 'सार्वजनिक…

1 दिवस ago

रांजणगाव पोलीस स्टेशन हद्दीत २८ किलो गांजा जप्त; महिलेसह एक आरोपी अटक

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनच्या पथकाने अंमली पदार्थविरोधी मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई केली.…

2 दिवस ago

सरकारच्या निष्क्रियतेमुळे तरुणांच्या आत्महत्या वाढत आहेत; ॲड. संग्राम शेवाळे

मुंबई (प्रतिनिधी) राज्यात दरवर्षी हजारो तरुण आत्महत्या करत आहेत. हि केवळ आकड्यांची बाब नाही, तर…

2 दिवस ago

शिरुर तालुक्यात प्रशासनाकडुन गोपनीयता फाट्यावर; तक्रारदारचं असुरक्षित…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात तहसिल प्रशासनाची बेपर्वाई आणि निष्काळजीपणा वेळोवेळी उघड होत असुन तक्रारदाराने…

3 दिवस ago