शिरूर तालुका

सविंदण्यात तब्बल बावीस वर्षांनी पुन्हा भरला दहावीचा वर्ग

शिरुर (अरुणकुमार मोटे): सविंदणे (ता. शिरुर) येथील गुरुदेव दत्त विद्यालयात शिक्षण घेतलेल्या१९९९ -२०००या इयत्ता १०वीच्या बॅचच्या विदयार्थ्यांनी सर्वच क्षेत्रात प्रगती करत मोठे नावलौकिक मिळवले असून वेगवेगळ्या क्षेत्रात नैपुण्य मिळवून विशेष उंची प्राप्त केली आहे. अशा १९९९-२००० बॅचच्या विद्यार्थ्यांचा तब्बल २२ वर्षांनी स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यामुळे सर्वच विदयार्थी, शिक्षक बऱ्याच दिवसांनी एकमेकांना भेटल्यामुळे या भेटीचा आंनद सर्वांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. अनेक जणांनी आपल्या मनोगतातून आपल्या भावना व्यक्त केल्या. विद्यालयात एकत्र आलेल्या तत्कालीन शिक्षकांसह विद्यार्थांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

रोजच्या धकाधकीच्या जीवनातून वेळ काढत शिक्षण घेतलेल्या विद्यालयाच्या माजी विद्याथ्र्याच्या आयोजनातून तब्बल २२ वर्षांनी पुनश्च भेटीचा योग जुळून आला. व्हॉट्सअॅप च्या माध्यमातून नंबर मिळवत ते एकमेकांना संपर्क एकत्र आले. या बॅचचे वैशिष्ट म्हणजे या बॅचमधून उच्च शिक्षण घेत स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून उपायुक्त, वैद्यकिय अधिकारी, प्रगतशील शेतकरी वकील, इंजिनिअर, आदर्श पत्रकार , राजकारणी, व्यापारी, बँक मॅनेजर, कॉन्ट्रॅक्टर, तसेच देशसेवा करणारे आजी माजी सैनिक, खाजगी कंपनीत विविध प्रकारचे पदावर काम करणारे विद्यार्थी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, उत्तम गृहिणी, शिक्षिका, उद्योजक, शेअर्स मार्केटींग,फायनल सम्राट, हॉटेल, इलेक्ट्री शयन, डेकोरेटर व्यावसायिक अशा समाजकारण ,राजकारण आणि कौंटुबिक जबाबदारी म्हणुन उत्कृष्ठ पालक घडलेली एक आगळी वेगळी बॅच म्हणुण संबोधली जात आहे.

विद्यार्थी व पालक, शिक्षकांचे तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचे अनुभव व त्यावेळी चे गमती जमती ऐकण्याची ची सुवर्ण संधी त्यामुळे मिळाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाळासाहेब भोर हे होते. यावेळी शिक्षक नप्ते सर, गोरे सर, गावडे सर, कळमकर सर, पोळ सर, इचके सर, मिसाळ मॅडम, दुसाने मॅडम, पुंडे सर, शिंदे सर, साकोरे सर दुसाने सर, महामुनी सर ,पवार मामा हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भिमा लंघे, राजश्री मोटे यांनी केले. आभार अॅड. अविनाश लंघे यांनी मानले. कार्यक्रमानंतर सर्वांनी सुग्रास स्नेह भोजनाचाआंनद लुटला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

7 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

15 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

3 दिवस ago