शिक्रापुरात प्रथमच पोलिसांच्या उपस्थितीत कॅमेरा सह ग्रामसभा
शिक्रापूर (शेरखान शेख): शिकापूर (ता. शिरुर) येथे कित्येक दिवसाने आज ग्रामसभा संपन्न झालेली असताना शिक्रापूर मध्ये प्रथमच पोलीस कर्मचाऱ्याच्या उपस्थितीत तसेच व्हिडिओ शुटींग मध्ये ग्रामसभा संपन्न झाली मात्र तब्बल तीन तासहून अधिक काळ चाललेली ग्रामसभा फक्त कचरा, आरोग्य व दारु प्रश्नावर चांगलीच रंगली असल्याचे दिसून आले.
शिक्रापूर (ता. शिरुर) ग्रामपंचायतच्या वतीने काल ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरपंच रमेश गडदे, उपसरपंच विशाल खरपुडे, माजी उपसरपंच मयूर करंजे, रमेश थोरात, सुभाष खैरे, ग्रामपंचायत सदस्य कृष्णा सासवडे, प्रकाश वाबळे, त्रिनयन कळमकर, पूजा भुजबळ, उषा राऊत, मोहिनी युवराज मांढरे, सीमा लांडे, शालन राऊत, मोहिनी संतोष मांढरे, वंदना भुजबळ, ग्रामविकास अधिकारी शिवाजी शिंदे, सोसायटीचे चेअरमन निलेश थोरात, कृषी सहाय्यक अशोक जाधव, उद्योजक रवींद्र भुजबळ, सामाजिक कार्यकर्त्या मंगल सासवडे, अंकुश घारे, सतीश सासवडे, निलेश उबाळे, अक्षय मांढरे, महेश चव्हाण, शक्ती केंडे, अतुल थोरवे, समीर शेख, निवृत्ती काळोखे यांसह आदी ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान यावेळी कचरा हा मुख्य विषय ग्रामसभेत पार पडला असता गावातील कचरा समस्या सोडवण्यासाठी अद्याप कायमस्वरूपी जागेचा प्रश्न मिटलेला नाही तसेच इतरत्र कचरा पडू नये यासाठी ठराविक ठिकाणी कचरा कुंडी बसवण्याचा निर्णय घेत उघड्यावर कचरा टाकणाऱ्या इसमावर दंड आकाराने, हॉस्पिटल चालकांना त्यांच्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याबाबतच्या सूचना देणे, गावातील हॉटेल, व्यावसायिक यांचा कचरा कचरा गाडीतून नेण्याबाबत दरपत्रक बनवणे यांसह आदी निर्णय कचरा समस्या सोडवण्यासाठी घेण्यात आले आहे. नुकत्याच होणाऱ्या ग्रामसभेचे ठराव प्रत देखील ग्रामस्थांना तातडीने देण्याचा देखील निर्णय घेण्यात आला.
सामाजिक कार्यकर्त्या मंगल सासवडे व शेरखान शेख यांनी लोकवस्तीतील दारुचे दुकान बंद करण्याची मागणी केली असता सदर दारू दुकानदाराला यापूर्वी नोटीस दिलेली असून नव्याने नोटीस देऊन देखील दारु दुकान बंद न झाल्यास सदर दुकानावर ग्रामपंचायत च्या माध्यमातून मोर्चा काढून दुकान बंद करण्याचा देखील निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला.
ग्रामसभेतून मी शिक्रापूरकर मोहिमेतील युवकांचे आभार…
शिक्रापूर येथील शंभरहून अधिक युवकांनी मी शिक्रापूरकर मोहीम सुरु करुन गावातील स्वच्छतेसह सामाजिक प्रश्न सोडवून आदर्श निर्माण केला असताना सदर मी शिक्रापूरकर मोहिमेतील युवकांचे ग्रामसभेतून आभार मानण्यात आले.
मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या गजबजलेल्या सबवेमध्ये औरंगाबादहून पर्यटनासाठी आलेल्या कुटुंबातील एक ८ वर्षांची…
मुंबई: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अ.भा.वि.प.) मुंबई महानगराच्या वतीने मुंबई विद्यापीठाच्या TY B.Com (Sem VI)…
मुंबई: “आम्ही सैनिक आहोत, खेळणं नाही... आम्हालाही सन्मानाने जगू द्या!” – ही हाक आहे महाराष्ट्रातील…
मुंबई: सातारा जिल्ह्याचे वादग्रस्त पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या सांगली येथील बदलीनंतर नवा वाद उफाळून…
मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसस्थानके, कार्यालये, कार्यशाळा आणि आगारांच्या छतांवर सौरऊर्जेच्या माध्यमातून…
महिला आरक्षणावर उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांचा काँग्रेस-समाजवादी पक्षावर हल्लाबोल मुंबई: ‘नारीशक्ती वंदन’ विधेयकाबाबत लोकसभेत स्पष्ट…