शिरूर तालुका

शिरुर तालुक्यातील सणसवाडीत घरातून गेलेला इसम बेपत्ता

शिक्रापुर (शेरखान शेख) सणसवाडी (ता. शिरुर) येथे राहणारा तिरुपती अन्नकाडे या इसम बाहेर जाऊन येतो असे म्हणून गेल्यानंतर बेपत्ता झाल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे इसम बेपत्ता झाल्याबाबतची खबर देण्यात आली आहे.

सणसवाडी येथील तिरुपती अन्नकाडे हा इसम सकाळच्या सुमरास मी बाहेर जाऊन येतो असे पत्नीला सांगून गेला. त्यांनतर दिवसभर तो घरीच आला नाही. त्यामुळे त्याच्या पत्नीने शेजारी तसेच सर्व नातेवाईकांकडे त्याची चौकशी केली असता तो कोठेही मिळून आला नाही. बेपत्ता इसमाचे नाव तिरुपती बबनराव अन्नकाडे (वय ३७ ) उंची सहा फुट, रंग गोरा, काळे केस, पुढे टक्कल, डावे हातावर सूर्याचे गोंधन, अंगात अबोली रंगाचा शर्ट व पांढऱ्या रंगाची प्यांट तसेच पायात चप्पल असे वर्णन आहे.

याबाबत जयश्री तिरुपती अन्नकाडे (वय ३५ ) रा. ग्रामपंचायत जवळ,सणसवाडी, ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिली असून या व्यक्तीबाबत कोणासही काही माहिती असल्यास शिक्रापूर पोलिसांशी ९६०४७९०५०१ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन शिक्रापूर पोलिसांनी केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक रवीकिरण जाधव हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

4 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

5 तास ago

दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची साथ का सोडली? खळबळजनक गौप्यस्फोट…

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावंत मानले जाणारे माजी गृहमंत्री…

6 तास ago

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

22 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

1 दिवस ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

1 दिवस ago