शिरूर तालुका

पारोडीतील जिओ टॉवर रात्री बंद; संतप्त ग्रामस्थांचा टॉवरवर चढून आंदोलनाचा इशारा

शिक्रापूर (ओमकार भोरडे): पारोडी हद्दीतील एनएच-५४८ महामार्गालगत उभारण्यात आलेला जिओ कंपनीचा मोबाईल टॉवर वारंवार बंद राहत असल्याने पारोडी व पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी टॉवर बंद केला जात असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला असून, यामुळे मोबाईल नेटवर्क सेवा पूर्णपणे विस्कळीत होत असल्याचे त्यांनी सांगितले.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, टॉवर बहुतांश वेळा नागरिक झोपल्यानंतर बंद केला जातो आणि सकाळी पुन्हा सुरू केला जातो. त्यामुळे शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधणेही अशक्य होत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

याच टॉवरच्या परिसरात मागील वर्षी एका शेतकऱ्याच्या ४७ गोण्या डाळिंब चोरी करण्याचा प्रयत्न झाला होता. त्या वेळी नेटवर्क उपलब्ध नसल्यामुळे इतर ग्रामस्थ किंवा पोलिसांशी तातडीने संपर्क साधणे शक्य झाले नसल्याचे समोर आले होते. शेतकऱ्याच्या प्रसंगावधानामुळे मोठे नुकसान टळले होते.

टॉवर वारंवार बंद राहत असल्याने चोरीच्या घटनांना चालना मिळू शकते, अशी भीतीही ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. या समस्येबाबत अनेक वेळा जिओ कस्टमर केअरकडे तक्रारी करूनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. विविध माध्यमांतून बातम्या प्रसिद्ध होऊनही कंपनी प्रशासनाने अद्याप दखल घेतली नसल्याने ग्रामस्थांचा संताप वाढला आहे.

दरम्यान, पुढील आठ ते दहा दिवसांत या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढला गेला नाही, तर रस्ता रोको आंदोलनासह जिओ टॉवरवर चढून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा पारोडी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कोकरे, रविराज टेमगिरे, रजनी अविनाश टेमगिरे व इतर ग्रामस्थांनी दिला आहे.

पारोडी व पंचक्रोशीतील नागरिकांना अखंडित मोबाईल सेवा उपलब्ध करून देण्यासाठी जिओ कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

6 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

14 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

3 दिवस ago