शिरूर तालुका

शिरूर तालुक्यात कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा; शहीद जवानांना विद्यार्थ्यांकडून आदरांजली

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथील सेंट जोसेफ इंटरनॅशनल स्कूलमध्ये ‘कारगिल विजय दिवस’ अत्यंत प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्याच्या उद्देशाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध पायलटिंगने झाली. यानंतर विद्यार्थ्यांनी ‘गार्ड ऑफ ऑनर’ द्वारे शहीद जवानांना मानवंदना अर्पण केली. शस्त्र विसर्जन सोहळ्याद्वारे शौर्य आणि त्यागाची जाणीव विद्यार्थ्यांना करून देण्यात आली.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी सैनिक सुभेदार देवराम मिंडे,कॅप्टन विश्वनाथ कोंडीबा ढवळे,नाईक सुभेदार बापूराव ढवळे, व महासैनिक कॅडेट फाउंडेशनचे संचालक सुभेदार शांताराम मोरे हे उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत विद्यालयाचे चेअरमन अनिल सर व प्राचार्या नॅन्सी पायस मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले.

विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गीत, नृत्य, नाटिका सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विशेषतः कारगिल युद्धावरील नाटिकेने उपस्थितांमध्ये कृतज्ञतेचे आणि अभिमानाचे भाव निर्माण केले. कार्यक्रमादरम्यान शहीद जवानांच्या बलिदानाला वंदन करत विद्यार्थ्यांनी ‘जय जवान’चा नारा दिला. प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. त्यांनी आपल्या भाषणांमध्ये भारतीय लष्कराच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित करत शौर्य आणि देशसेवेचे मोल स्पष्ट केले.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी प्राचार्या नॅन्सी मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानले व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले. “विद्यार्थ्यांच्या मनात देश प्रेम निर्माण करणे हीच सेंट जोसेफ शाळेची खरी जबाबदारी आहे,” असे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाची सांगता “वंदे मातरम्” गीताने झाली. देशभक्तीचा संदेश देणारा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांवर प्रेरणादायी ठरला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

श्री महागणपतीच्या दर्शन व्यवस्थेवर भाविकांचा संताप; ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांमधील समन्वयाचा अभाव चव्हाट्यावर

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : ‘देवाच्या दारी सर्व भक्त समान’ असा संदेश समाजाला देणाऱ्या धार्मिक…

7 तास ago

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

3 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

3 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

3 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago