शिरूर तालुका

वाघाळे येथील कविता धायबर यांचा ‘आदर्श महिला’ पुरस्काराने दिल्लीत सन्मान!

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील कविता संदीप धायबर यांना महिला सबलीकरण व उन्नतीकरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘जागतिक महिला दिना’च्या निमित्ताने ‘आदर्श महिला’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अपोलो टायर फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने दिल्ली येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पुरस्कारादरम्यान कविता धायबर यांच्या कार्याची चित्रफित दाखवण्यात आली. यावेळी उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करून दाद दिली. या सन्मान सोहळ्याला अंजुम चोप्रा यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.

कविता धायबर यांनी महिलांच्या सबलीकरणासाठी विविध उपक्रम राबवून समाजात सकारात्मक बदल घडवून आणला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या यशाबद्दल शिरूर तालुक्यातून कविता धायबर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, विविध स्तरांतून त्यांचे कौतुक केले जात आहे.

वाघाळे येथील कालिकामाता यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न!

वाघाळे गावच्या उपसरपंचपदी राजेंद्र धायबर यांची बिनविरोध निवड

वाघाळे येथून वाघेश्वर पायी दिंडी सोहळ्याचे भक्तिमय वातावरणात प्रस्थान…

Video: वाघाळे येथे ग्रामस्थांचा वाढदिवस एकत्रित साजरा…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago