महाराष्ट्र

जळोची रस्त्यावर २.३५ कोटींचा गांजा जप्त; होळीआधी बारामतीत मोठी कारवाई

बारामती: बारामती शहरात अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत शहर पोलिसांनी जळोची पिंपळी रस्त्यालगतच्या शेतात दोन टाक्यांमध्ये लपवून ठेवलेला तब्बल ४७० किलो गांजा शनिवारी (ता. २८) जप्त केला. बाजारभावानुसार या गांजाची किंमत सुमारे २ कोटी ३५ लाख रुपये असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.अतिरिक्त पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड तसेच पोलिस निरीक्षक श्रीशैल्य चिवडशेटटी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

गोपनीय माहितीवरून कारवाई

गोपनीय सूत्रांकडून जळोची रस्त्यावर दोन टाक्या कुलूपबंद अवस्थेत पडून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने घटनास्थळी धाव घेत टाक्यांची कुलूपे उघडली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गांजा लपवून ठेवलेला आढळून आला.पोलिसांच्या माहितीनुसार, प्रत्येकी एक किलो वजनाच्या सुमारे ४७० पॅकेटमध्ये हा गांजा पॅक करण्यात आला होता. विक्रीसाठीच हा साठा आणण्यात आला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

नाकाबंदीमुळे तस्करांचा डाव फसला?

बारामती शहरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या कडक नाकाबंदीमुळे तस्करांनी माल तेथेच टाकून पळ काढल्याची शक्यता अतिरिक्त पोलिस अधीक्षक बिरादार यांनी व्यक्त केली. होळी सणाच्या पार्श्वभूमीवर वाढत्या मागणीचा अंदाज घेत हा साठा विक्रीसाठी आणला असावा, असा पोलिसांचा संशय आहे.

तस्करांचा शोध सुरू

बारामतीत एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात गांजा जप्त झाल्याने अंमली पदार्थांची तस्करी सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. सीसीटीव्ही फूटेज, गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संबंधित तस्करांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे बिरादार आणि राठोड यांनी सांगितले.या कारवाईमुळे बारामतीत खळबळ उडाली असून, आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधातील मोहीम आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

6 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

20 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

1 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

1 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

1 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

1 दिवस ago