शिरूर तालुका

खंडाळे गावच्या सरपंचपदी कविता संतोष खेडकर यांची बिनविरोध निवड

रांजणगाव गणपती (तेजस फडके): खंडाळे (ता. शिरुर) गावच्या सरपंच पदी कविता संतोष खेडकर यांची बिनविरोध निवड झाली. मावळत्या सरपंच ज्योती मारुती नरवडे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदी कविता खेडकर यांची बिनविरोध निवड झाली.

यावेळी शिरुर-आंबेगाव राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर पाटील, रांजणगाव महागणपती देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा स्वाती पाचुंदकर पाटील, पंचायत समिती सदस्य विक्रम पाचुंदकर पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख बापूसाहेब शिंदे, घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक विश्वास ढमढेरे, केंदुर गावचे माजी सरपंच सुनील थिटे तसेच खंडाळे गावातील सर्व आजी माजी सरपंच, विकासोचे आजी-माजी अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना खंडाळे विकासोचे माजी अध्यक्ष संतोष खेडकर म्हणाले, गावामध्ये खेडकर परिवार मोठ्या संख्येने आहे. गावच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच खेडकरांना सरपंच पदासाठी संधी मिळाल्याने खेडकर यांनी गावातील खेडकर परिवाराला प्रथमच संधी दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

2 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

3 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

1 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago