क्रिडा प्रशिक्षक प्रकाश घोलप देणार तालुक्यातील मुलींना धडे
शिक्रापूर (शेरखान शेख): सध्याच्या काळात मुलींबाबत घडणाऱ्या वेगवेगळ्या घडामोडीमुळे मुलींना त्यांचे स्वतःचे रक्षण करण्यासाठी त्यांना स्वसंरक्षणाचे धडे मिळणे गरजेचे असल्याने क्रिडा प्रशिक्षक प्रकाश घोलप यांनी महाविद्यालयीन मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्याचे काम हाती घेतले आहे.
शिक्रापूर (ता. शिरूर) येथील आदर्श क्रीडा प्रशिक्षक प्रकाश घोलप कराटे सारख्या क्रीडा प्रकारातून अनेकांना प्रशिक्षण देत असताना शाळा, महाविद्यालय या ठिकाणी मुलींना संरक्षणाचे धडे देण्याचे देखील कार्य करत आहेत. कोरोना काळापासून हे कार्य बंद असताना आता नव्याने सदर कार्य त्यांनी सुरू केले त्यानंतर तळेगाव ढमढेरे येथील महाविद्यालयात त्यांनी स्वसंरक्षणाचे धडे व प्रशिक्षण मुलींना देत महिलांची होणारी छेडछाड समाजकंटकांकडून होणारा त्रास यावर प्रतिकार करण्यासाठी आवश्यक असे प्रशिक्षण देत मुलींना शारीरिक दुःखदृष्ट्या सक्षम बनण्याची गरज असल्याचे सांगत मुलींनी उत्तम आहार घेत व्यायाम करण्याची आवश्यकता असल्याचे देखील प्रकाश घोलप यांनी सांगितले.
यावेळी इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. पराग चौधरी, ॲड. सोनाली वडघुले, आरोग्य सहाय्यिका कुसुम निघूट, विद्यार्थी विकास मंडळाचे अधिकारी डॉ. विवेक खाबडे, दत्तात्रय करंडे, डॉ. अमेय काळे, प्रा. मीनाक्षी दिघे, प्रा. कल्याणी ढमढेरे, प्रा. अजिता भूमकर यांसह आदी उपस्थित होते.
यावेळी ॲड. सोनाली वडघुले यांनी विद्यार्थिनींना महिला संरक्षक कायदे व संविधानामध्ये महिलांना असणारे कायद्याचे संरक्षण याबाबत माहिती दिली तसेच आरोग्य सहाय्यिका कुसुम निघूट यांनी विद्यार्थिनींना विवाहपूर्व समुपदेशन व आरोग्य विषयक महत्त्वपूर्ण माहिती दिली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दत्तात्रय करंडे यांनी केले तर प्रास्ताविक डॉ. विवेक खाबडे यांनी केले आणि डॉ. अमेय काळे यांनी आभार मानले.
अनेक वर्षापासून मुलींसाठी मोफत कराटे प्रशिक्षण देत असताना कोरोणा मुळे अडचण आली मात्र आता मुलींच्या संरक्षणासाठी हे काम पुन्हा सुरू करण्यात आले असून शिरूर तालुक्यातील प्रत्येक ठिकाणी आपण हा उपक्रम राबवणार असल्याचे प्रकाश घोलप यांनी सांगितले.
पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…
आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…
सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…
धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…
लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…
पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…