शिरूर तालुका

मकर संक्रांतीचा दिवस पौष्टिक तृणधान्य दिन म्हणून साजरा होणार

शिक्रापूर (शेरखान शेख): आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्ताने राज्य शासनाने मकर संक्रांती अर्थात भोगी हा सणाचा दिवस दरवर्षी पौष्टिक तृणधान्य दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला असून या दिवशी कृषी विभागाने क्षेत्रीय स्तरावर विविध उपक्रमांचे आयोजन करावे तसेच सर्व शासकीय विभागांनीही उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

२०२३ हे नवीन वर्ष संयुक्त राष्ट्रसंघाने आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले असून त्याअनुषंगाने कृषि विभागामार्फत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्या माध्यमातून पौष्टिक तृणधान्य पिकांचे आहारातील महत्व, त्याचे फायदे सर्वसामान्यांपर्यंत पोहाचवण्यात येणार आहे. तसेच तृणधान्य पिकांचे क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता वाढ कार्यक्रम हाती घेणार आहे.

कृषी विभागाने ६ जानेवारी २०२३ रोजी शासन निर्णय जारी करुन आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ अंतर्गत मकर संक्राती भोगी हा सणाचा दिवस दरवर्षी राज्यामध्ये पौष्टिक तृणधान्य दिन म्हणून साजरा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या दिनाचे औचित्य साधून कृषि सहाय्यकांना गावामध्ये प्रशिक्षण कार्यक्रम, आरोग्यावर आधारित चर्चासत्रांचे आयोजन आदी उपक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देश देण्यात आले.

यामध्ये तृणधान्य पिकांच्या विविध जाती, त्यांचे लागवड तंत्रज्ञान, तृणधान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या यशोगाथा, मुलाखती, तृणधान्य पिकापासून बनवण्यात येणारे विविध पदार्थ याची माहिती देणे यासाठी प्रगतीशील शेतकरी, आहार तज्ज्ञ, विद्यापीठाचे शास्त्रज्ञ यांना निमंत्रित करण्यत येणार आहे.

सर्व स्तरातील बालके, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, कामगार व कार्यालयीन कर्मचारी अधिकारी यांना विविध योजने अंतर्गत उपहारगृहातून फराळ, मध्यान्ह भोजन पुरविण्यात येते अशा सर्व शासकीय विभागांनी मकर संक्राती अर्थात भोगी या दिवशी आहारामध्ये पौष्टिक तृणधान्याचा जाणीवपूर्वक वापर करावा. मकर संक्रांती हा दिवस प्रत्येक जिल्ह्यामध्ये पौष्टिक तृणधान्य दिन म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सविंदणे विद्यालयात ‘अजितदादा एआय लॅब’चे उद्घाटन!

विद्यार्थ्यांना एआय, रोबोटिक्स, ड्रोन आणि थ्रीडी प्रिंटिंगचे मिळणार प्रात्यक्षिक शिक्षण; उच्च शिक्षणासाठी ठरणार उपयुक्त शिरूर…

3 तास ago

पुण्यात पाणीटंचाईचे संकट गडद! महापौर मंजुषा नागपुरेंचे प्रशासनाला कडक आदेश

पाणीगळती, पाणीचोरी आणि टँकरच्या काळाबाजारावर कारवाई होणार; पिण्याच्या पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांचे नळजोड तोडणार! पुणे :…

10 तास ago

शिरुर; न्हावरे रस्त्यावर दुचाकीवरुन पडुन जखमी झालेल्या २६ वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील न्हावरा रोड येथे दुचाकीवरुन पडून गंभीर जखमी झालेल्या २६ वर्षीय…

11 तास ago

शिरूर तालुक्यात दिवसाढवळ्या चोरी; घरातून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास…

न्हावरे (अक्षय टेमगिरे) : घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करुन…

11 तास ago

हृदयद्रावक! शिरूर तालुक्यात अखंड हरिनाम सप्ताहातून घरी परतणाऱ्या तिघांना ट्रकने चिरडले…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : आंबळे (ता. शिरूर) येथील अखंड हरिनाम सप्ताहातील खोले महाराज यांचा कीर्तनाचा…

13 तास ago

शिरूर! कारेगावात तरुणाच्या गळ्यावर धारदार शस्त्राचा वार करत थेट जीव घेण्याचा प्रयत्न…

कारेगाव (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात गुन्हेगारीचे प्रकार थांबण्याचे नाव घेत नसतानाच कारेगाव येथे एका…

13 तास ago