शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथील चासकमान कालव्याच्या पाण्यामध्ये खेड तालुक्यातील बेपत्ता युवकाचा मृतदेह आढळून आला असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
करंदी (ता. शिरुर) येथील चासकमान कालव्याच्या पाण्यामध्ये एका युवकाचा मृतदेह तरंगत असल्याचे नागरिकांना दिसले याबाबतची माहिती पोलीस पाटील वंदना साबळे यांनी शिक्रापूर पोलिसांना दिली. दरम्यान पोलीस हवालदार कृष्णा व्यवहारे, स्वप्निल गांडेकर, होमगार्ड योगेश बधे, पोलीस पाटील वंदना साबळे यांनी सदर ठिकाणी धाव घेत सामाजिक कार्यकर्ते राघू नपते, कचरू वाजे, कोंडीबा साबळे, अमोल नपते, विशाल नपते, संभाजी सातपुते, संदीप बेंडभेर, विनायक सातपुते, अतिश साबळे, दिगंबर फुलसुंदर, महादेव मांजरे यांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढला.
यावेळी सदर मृतदेह हा निमगाव खंडोबा येथून बेपत्ता झालेल्या दादाभाऊ पोपट भालेराव (वय २८) रा. निमगाव खंडोबा ता. खेड जि. पुणे या युवकाचा असल्याचे समोर आले. याबाबत सुरेश बाबुराव भालेराव रा. निमगाव खंडोबा ता. खेड जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलीस करत आहे.
शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…