शिरूर तालुका

शिरुर तालुक्यात पतीच्या नातेवाईकाकडुन विवाहित महिलेचा विनयभंग

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील एका गावात एका २४ वर्षीय विवाहित महिलेला फोन करुन तिचा पती घरी नसल्याचा फायदा घेत पतीच्या जवळच्या नातेवाईकाने (दि १२)ऑगस्ट रोजी दुपारी १२:३० च्या सुमारास घरात शिरुर तिचा विनयभंग केल्याची घटना घडली असुन याबाबत शिरुर पोलिस स्टेशनला बाजीराव बाळासाहेब थोरात (रा.बोरी ता.श्रीगोंदा जि. अ. नगर) याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.

 

शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील एका गावात फिर्यादी असलेल्या २४ वर्षीय महिलेला तिच्या पतीच्या जवळचा नातेवाईक बाजीराव बाळासाहेब थोरात याने फोन करुन तुला आईस्क्रीम आणू कां…? असे विचारले. त्यावर फिर्यादीने मला आईस्क्रीम नको असे सांगितले. त्यानंतर १२:३० च्या सुमारास बाजीराव थोरात हा फिर्यादीच्या राहत्या घरासमोर आला. त्यावेळी त्यास फिर्यादी महिलेने माझे पती घरी नाहीत. तू घरी येवु नको असे सांगितले. तरीही तो घरात येवु लागला.

 

त्यावेळी फिर्यादी महिला त्यास बाहेर ढकलु लागली असता त्याने फिर्यादीला घरात ढकलले आणि तिचे दोन्ही हात धरुन तु मला आवडतेस तू मला हवी आहे असे बोलुन फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. त्यावेळी फिर्यादी महिलेने आरडाओरडा करु लागली असता. त्याने त्यांचे तोड दाबले त्यानंतर फिर्यादीचा पती हे कामावरुन घरी आले. त्यानंतर त्यांना पाहुन तो फिर्यादीला ढकलुन देवुन निघुन गेला. म्हणुन आरोपी विरुध्द शिरुर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार पोलिस नाईक मोरे हे करत आहेत.

धक्कादायक; पुणे-मुंबई जुन्या महामार्गावर लोणावळा येथे सेल्फीसाठी तरुणाईचा जीवघेणा स्टंट

शिरुर तालुक्यात अजुनही पोर्शे पॅटर्न जोरात, पोलिसांचे दुर्लक्ष; कडक उपाययोजना करण्याची गरज

मांडवगण फराटा येथे टेम्पो व दुचाकीच्या धडकेत पंधरा वर्षीय विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

3 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

4 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

1 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago