शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील मार्केट यार्ड परिसरात वडिलांसह शेतमाल विक्रीस आलेल्या सोळा वर्षीय अल्पवयीन युवतीचा पिकअप चालकाने विनयभंग केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे पिकअप चालक अमोल जनार्दन वायदंडे याचे विरुद्ध बाललैंगिक अत्याचारसह आदी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील मार्केट यार्ड मध्ये पिडीत अल्पवयीन युवती तिच्या वडिलांसह शेतमाल विक्री करण्यासाठी अमोल वायदंडे याच्या पिकअप मध्ये आलेली होती. युवतीचे वडील बाजारात गेलेले असताना अमोल याने युवतीला मी अनेक दिवस तुझ्या मागे आहे, असे म्हणत युवतीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. त्यानंतर युवतीने घरी जात घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितला.
याबाबत पिडीत युवतीने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी पिकअप चालक अमोल जनार्दन वायदंडे रा. कोंढापुरी (ता. शिरुर) जि. पुणे याच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस निरीक्षक माधुरी झेंडगे करत आहे.
चारचाकीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा? छळाच्या आरोपावरून सात जणांविरुद्ध गुन्हा छत्रपती संभाजीनगर : अवघ्या चार…
पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या प्रकरणात अमित…
मुंबई: वांद्रे-वरळी सी लिंक रेक्लेमेशनजवळ कोस्टल रोडवर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात…
पुणे : भाविकांना भीमाशंकर येथे दर्शनासाठी घेऊन आलेल्या २५ वर्षीय तरुण कारचालकाचा अचानक हृदयविकाराचा झटका…
शिक्रापूर (सुनिल जिते): शिक्षक दिनाचे औचित्य साधून मलठण विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या वतीने गावातील…
मुंबई : राज्यभरात दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा होत असतानाच मुंबई आणि नवी…