मुख्य बातम्या

शिरुर तालुक्यात माजी उपसरपंचाला ऐन यात्रेवेळी पोलिसांकडून अटक

शिक्रापूर पोलीस स्टेशन मध्ये गोंधळ घालत फोडली काच

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन मध्ये दारु पिऊन आरडाओरडा करत गोंधळ घालून पोलिसांच्या अंगावर धावून जात कपाटाची काच फोडल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे केंदूरच्या ऐन यात्रेवेळी माजी उपसरपंच राजेंद्र हिरालाल ताठे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करत त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे.

वाजेवाडी (ता. शिरुर) येथील चौफुला येथे काही इसम दारु पिऊन गोंधळ घालत असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांना मिळाली असता पोलीस नाईक हेमंत कुंजीर व संतोष शिंदे यांनी सदर ठिकाणी जात पाहणी केली असता 3 व्यक्ती गोंधळ घालताना दिसून आले. दरम्यान केंदूरचे माजी उपसरपंच असलेले राजेंद्र ताठे हे पोलिसांच्या अंगावर धावून येत दमदाटी करु लागले.

दरम्यान पोलिसांनी त्यांना पोलीद स्टेशन येथे आणले असे ताठे हे पोलीस स्टेशन मध्ये आरडाओरडा करत गोंधळ घालू लागले, दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे, पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आजिनाथ शिंदे, पोलीस नाईक हेमंत कुंजीर, संतोष शिंदे, पोलीस शिपाई स्वप्नील गांडेकर, अंकुश चौधरी हे त्यांना समजावून सांगत असताना ते पोलिसांच्या अंगावर धावून जाऊन, पोलिसांना धक्काबुक्की करत गोंधळ घालू लागले, याच वेळी राजेंद्र ताठे यांनी पोलीस स्टेशन मधील कपाटाची काच देखील फोडून टाकली.

याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक हेमंत अशोक कुंजीर रा. शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी केंदूरचे माजी उपसरपंच राजेंद्र हिरालाल ताठे (वय ४२) रा. केंदूर (ता. शिरुर) जि. पुणे यांचे विरुद्ध गुन्हे दाखल करत अटक केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आजिनाथ शिंदे हे करत आहे.

ऐन यात्रेच्या दिवशी माजी उपसरपंच अटक…

केंदूर (ता. शिरुर) गावची रामनवमी निमित्त यात्रा असतानाच गावचे माजी उपसरपंच असलेले राजेंद्र ताठे यांच्यावर ऐन यात्रेवेळी गंभीर गुन्हे दाखल होत पोलीस कोठडीत आपली यात्रा साजरी करण्याची वेळ आली असल्याचे दिसून आले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई बनेल जगाची फिनटेक राजधानी; एजंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानातून महाराष्ट्रात वित्तीय क्रांती

मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…

9 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत; ब्रिटिश संसदेत होणार सन्मान

लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…

9 तास ago

शेतकरी संकटात, सरकार मात्र शक्तिपीठाच्या विषयात; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…

9 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचा डंका! ब्रिटिश संसदेत तीन पुरस्कारांनी होणार गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…

9 तास ago

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

15 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

16 तास ago